मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- द्रुतगती महामार्गावर अपघातात महाबळेश्वरच्या चौघांचा मृत्यू
- कोल्हापूरची टोल आकारणी कृती समितीच्या चर्चेनंतर- हर्षवर्धन पाटील
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- पाणी प्रश्नावरून नगरसेवक व नागरिकांनी 'ओसीडब्ल्यू'च्या कार्यालयातील साहित्य जाळले
- शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडणार
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
मानसिक संतुलन हरवलेल्या एका आदिवासी महिलेने दोन मुलींसह प्रवरा नदीत उडी घेऊन तिघींची जीवनयात्रा संपवली. अकोले तालुक्यातील रंधा येथे ही घटना घडली.
राजूर पोलिसांनी सांगितले की, रंधा बुद्रुक येथील महिला सुनीता काळू मराडे (वय २४) ही दोन दिवसांपासून संध्या (४ वर्षे) व निकिता (२ वर्षे) या दोन छोटय़ा मुलींसह बेपत्ता होती. या तिघींचे मृतदेह आज सकाळी रंधा धबधब्याजवळील वीज निर्मिती प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ नदीपात्रात सापडले.
सुनीता हिला दोन मुलींच्या पाठीवर अलीकडेच तिसरी मुलगी झाली, मात्र ती मयत झाली. या मुलीचे निधन ती सहन करू शकली नाही. या दु:खानेच ती मानसिक संतुलन हरवून बसली होती. दोन दिवसांपूर्वी दोन मुलींसह घरातून बेपत्ता झाल्यानंतर काल (शुक्रवार) तिने आत्महत्या केली. दोन्ही मुलींना तिने एका ओढणीने स्वत:च्या पोटाला बांधून प्रवरा नदीत उडी घेतली. येथीलच रहिवासी पोपट मराडे यांना आज सकाळी रंधा धबधब्याजवळ या मायलेकींचे मृतदेह नदीपात्रात तरंगताना दिसले.
त्यांनी तातडीने राजूर पोलिसांना त्याची कल्पना दिली. घटनेची माहिती मिळताच संगमनेर विभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र पगार, राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक एम. एम. कासार यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
राजूर पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला. येथील ग्रामीण रुग्णालयात तिन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन केले. पुढील तपास हवालदार एल. व्ही. काकड करीत आहेत.


















अतिशय दुर्दैवी घटना आहे, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. आपण एक बाह्य समाजमन म्हणून ह्याचा विचार करतो आणि केवळ ‘कोरडी सहानुभूती’ दाखवण्याचा प्रयत्न करतो. तसे नसते, तर ह्या माउलीला “आदिवासी” म्हणून हिणवण्याची आपली हिम्मतच झाली नसती! आपण उठता-बसता, हागता-मुतता केवळ दुसऱ्यांची ‘जात’ बघतो आणि तेच आपल्या वागण्यातून, लिखाणातून आणि देहबोलीतून दाखवून देत असतो. असो…..ह्या घटनेवरून आणि अलीकडेच घडलेल्या अनेक घटनांवरून असे दिसते कि भारतीय नारीच्या (bollywood सोडून) स्वाभिमानाला (म्हणजेच चारित्र्याला) जराही धक्का लागला तरी ती सहन करू शकत नाही. हा सदगुण केवळ भारतीयांमध्येच आहे, पाश्चिमात्त्यांमध्ये नाही. एकीकडे हि स्वाभिमानी माउली आणि दुसरीकडे दररोज अगणित वेळा नग्न होणारी ‘तथाकथिक’ आधुनिक भारतीय स्त्री, हेही विचार करायला लावणारे आहे. भारतीय समाजाची ग्रामीण (प्रामाणिक, स्वाभिमानी) आणि शहरी (बेईमान) अशी दोन शकले त्यातूनच तयार झाली आहे.