रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावर महाड जवळ गांधारपाले गावानजीक आज पहाटे दोन व्होल्वो लक्झरींची समोरासमोर टक्कर होऊन अपघात झाला आहे.
हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात दोनही वाहनांचे वाहन चालक जागच ठार झाले असून दहा प्रवाशी जखमी झाले आहेत. यातील जखमी प्रवाशांवर महाड येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू असून त्यातील दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती महाड पोलिसांनी दिली आहे. गांधारपाले गावाजवळील या अवघड वळणावर कोणतेही दिशादर्शन फलक नसल्याने असे अनेक अपघात याठिकाणी होतात अशी माहिती मिळत आहे.

(संग्रहित छायाचित्र)