मालमोटारीला धडक; मोटारीतील तिघे ठार

येथील कन्हैयालालनगर भागात उभ्या असणाऱ्या मालमोटारीला मारुती मोटारीने धडक दिलेल्या अपघातात तीनजण जागीच ठार

जालना/वार्ताहर | November 19, 2012 08:06 am

येथील कन्हैयालालनगर भागात उभ्या असणाऱ्या मालमोटारीला मारुती मोटारीने धडक दिलेल्या अपघातात तीनजण जागीच ठार झाले. सोमवारी पहाटे चार ते पाचच्या दरम्यान हा अपघात घडला. अर्जुन सुपेकर, जोहराबी पठाण व निळकंठ जाधव अशी अपघातात जागीच मरण पावलेल्यांची नावे आहेत. मोटारीच्या चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडला. सदर बाजार पोलीस ठाण्यात या अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला.

First Published on November 19, 2012 8:06 am

Web Title: accident of truck three dead
टॅग: Accident,Jalna