मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- अल्पसंख्याक सूचीमध्ये जैन धर्माच्या समावेशासाठी प्रयत्न करू - मुख्यमंत्री
- संगमनेरजवळ पेट्रोलपंपावर ६५ हजारांची लूट
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- तरुणीचा खून करून मृतदेह जाळल्याच्या प्रकरणात एकाला फाशी, दुसऱ्याला जन्मठेप
- सार्वजनिक बांधकाम विभागात पाच हजार कोटींचा घोटाळा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
चेहऱ्यावर कपडा बांधून आलेल्या दोघांनी शहरातील मोगलाई भागात केलेल्या 'अॅसिड' हल्ल्यात गंभीर जखमी युवकाची प्रकृति चिंताजनक असून त्याच्यावर मुंबई येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून हल्लेखोरांना अटक करावी, या मागणीसाठी गवळी समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना निवेदन दिले आहे.
मोगलाई भागात ३० नोव्हेंबरच्या रात्री सदाशिव अर्जुन गवळी (४२) रा. गवळीवाडा, यांच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर दोघांनी अॅसिड फेकले. हल्लेखोरांनी आपले चेहरे कपडय़ाने बांधले होते. काही कळण्याच्या आत हा प्रकार घडला. सदाशिव यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्रथमोपचारानंतर त्यांना मुंबई येथे उपचारार्थ पाठविण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. त्यानंतर त्यांना मुंबई येथे रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृति चिंताजनक आहे. या प्रकारामुळे मोगलाई भागात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन तरुणांची चौकशी सुरू केली आहे. हल्लेखोरांचा उद्देश सदाशिव गवळी यांना जिवे मारण्याचा होता, यामुळे हल्लेखोरांना अटक करून कठोर शिक्षा करावी, अशी मागणी समाजाचे अध्यक्ष शिवाजी लंगोटे, शिवसेनेचे महानगर प्रमुख भूपेंद्र लहामगे, नगरसेवक भगवान गवळी आदींनी केली आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा


















