तमिळनाडूमध्ये जलिकटट्टीवरुन सुरु झालेल्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आता त्याचे महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. तामिळनाडूप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही बैलगाडा शर्यतवरील बंदी उठविण्यासाठी वटहुकुमाद्वारे प्रयत्न करावा, या मागणीसाठी आज पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडा मालकांनी पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको केला.

पुण्याजवळील चाकण शहरातून जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्गावर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बैलगाडा शर्यतीवर घातलेल्या बंदीच्या विरोधात संताप व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बैलांसह पुणे-नाशिक महामार्ग अर्धा तास रास्ता रोको केला. या रास्तारोकोमुळे महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या. पोलिसांचा कडक बंदोबस्त असल्याने यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र या आंदोलनाची दखल न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बैलगाडी मालक संघटनेने दिला आहे.