मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सोलापुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी महापालिकेकडून रेल्वेला प्रस्ताव
- विधवा अपंग महिलेच्या घराला महिला सावकाराने ठोकले कुलूप
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या गटांगळ्या
- कुत्र्यांच्या मदतीने हरणांच्या शिकारीचा संशय
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास चिरडणारा ट्रक जमावाने पेटवला
- वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण नियंत्रणाचा बोजवारा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
आज (शुक्रवार) सकाळी अजित पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. सिंचन घोटाळ्याची चौकशी तसेच खर्चाची कारणमीमांसा करण्यासाठी राजीनामा देत असल्याचे जाहीर करत अजित पवार यांनी २५ सप्टेंबरला उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादीच्या सर्व बड्या नेत्यांसह अजित पवारांतचे कुटुंबियही या शपथविधीला उपस्थित होते. मात्र, सुरेश शेट्टी आणि माणिकराव ठाकरे यांच्याव्यतिरिक्त कॉंग्रेसचे बडे नेते या शपथविधीला गैरहजर होते.
दरम्यान, अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची नैतिक अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
अजित पवार यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र सादर करण्यात आले होते. बुधवारी रात्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.
अवघ्या अडीच महिन्यांत अजित पवार सत्तेच्या वर्तुळात परतत आहेत. त्यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल सिंचनाच्या श्वेतपत्रिकेत अवाक्षरही काढण्यात आलेले नसले तरी त्यात 'क्लीन चिट' मिळाल्याचा दावा राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला व त्यांच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला.
उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेऊन तो स्वीकारणे अजित पवार यांनी पक्षाच्या नेतृत्वाला भाग पाडले होते. अजितदादांच्या राजीनाम्याचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पसंत पडला नव्हता हे त्यांच्या वक्तव्यावरून तेव्हा स्पष्ट झाले होते.



















एक धडाडीचा, स्पष्टवक्ता, देखणा राज्यकर्ता परत सक्रीय झाला त्याबद्दल अभिमान वाटतो. आता परत प्रसारमाध्यमांनी त्यांच्या बदनामीची ‘जातीय’ मोहीम राबवून त्यांना बदनाम करू नये. आणि करायचेच असेल तर निदान जनतेला पुरावे तरी दाखवावे. पवार कुटुंबाला जाणूनबुजून बदनाम करण्याचं छ्डयंत्र रचलेले आहे RSS ने या ‘ब्राह्मणी’ मेडिया ला हाताशी धरून. पण तेच गडकरी, गिरीश गांधी, विजय दर्डा, सतीश चतुर्वेदी इ. RSS चेच भांडवल पुरवठादार मुक्त वावरताहेत.
Hidden due to low comment rating. Click here to see.
अशोकभौ, पवार कुटुंबाबद्दल तुम्ही नमूद केलेले आरोप जरी घडीभर खरे मानलेत तरी ते अजून सिद्ध झालेच नाहीत हो! वा त्यांच्या विरुद्ध कोण्या न्यायालयाने (जेही RSS च्या प्रभावाखाली चालतात) खटला भरा हेही सांगितलं नाही? मग आम्ही सर्वसामान्य जनता ती केवळ हवा/बदनामीच समजू ना? लावासा वैगेरे प्रकरण जे तुम्ही म्हणता तिथे सारा RSS वाल्यांचाच पैसा आहे. उगाच पवारांना बदनाम करणे हाच त्यांचा धंदा आहे. कारण पवार नाव दररोज जप करण्याइतपत स्वस्त आहे. पवार साहेब माझे नातेवाईक नाहीत नाही आणि गडकरीहि नाही. पण एकदा तरी गडकरी, गिरीश गांधी, विजय दर्डा, सतीश चतुर्वेदी इ. RSS चेच भांडवल पुरवठादार यांची चौकशी तर करा. त्यांची संपत्ती बघा आणि ती मोजा म्हणजे कळेल काय म्हणतो ते. आभारी आहे!
सिंचन महाघोटाळ्याची चौकशी व अवास्तव खर्चाची कारणमीमांसा करण्यासाठी अजित पवार यांनी २५ सप्टेंबरला उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आगी शिवाय धुर नाही हा नैसर्गिक नियम आहे. शिवाय संभविताला अपकिर्ती ही मृत्युपेक्षा तापदायक वाटते. सरकारी चौकशी १०-१५ वर्षे चालते हे सर्वांना माहित आहे.दादांच्या राजीनाम्यानंतर वाटले होते की एक धडाडीचा राजकारणी कायमचा विजनवासात गेला. परंतु असे काही अद्भुत घडले की म्हणजे घोटाल्याची चौकशी व खर्चाची मिमांसा तात्काळ निकालात निघाली यावर विश्वास बसत नाही..या कारल्याहून कडु व साखरेहून गोड प्रसंगात काय गौड बंगाल आहे हे सामान्य नागरिकाला कळेल का?