मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल अमीर कसाब याला आज (बुधवार) पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली. यासंदर्भातला घटनाक्रम..* २६ नोव्हेंबर २००८ - कसाबसह दहा दहशतवाद्यांचा मुंबईवर हल्ला* २७ नोव्हेंबर २००८ - मध्यरात्री दीड वाजता कसाब पोलिसांच्या हाती लागला. अटकेनंतर नायर हॉस्पिटलमध्ये त्याची रवानगी* २९ नोव्हेंबर २००८ - दहशतवाद्यांच्या तावडीतील सर्व ओलिसांची सुखरूप सुटका. नऊ दहशतवादी ठार* ३० नोव्हेंबर २००८ - कसाबचा पोलिसांसमोर कबुलीजबाब*२७-२८ डिसेंबर २००८ - ओळखपरेड* १३ जानेवारी २००९ - २६/११च्या खटल्यासाठी एम. एल. ताहिलियानी यांची नियुक्ती* १६ जानेवारी २००९ - कसाबचा खटला आर्थर रोड तुरुंगात चालवण्याचा निर्णय* ५ फेब्रुवारी २००९ - कुबेर जहाजात सापडलेल्या वस्तूंवरील ठसे आणि कसाबचे डीएनए नमुने यांची जुळणी* २०-२१ फेब्रुवारी २००९ - महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे कसाबचा कबुलीजबाब* २२ फेब्रुवारी २००९ - उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती* २५ फेब्रुवारी २००९ - कसाबवर आरोपपत्र दाखल, आणखी दोघांवरही आरोपपत्र* १ एप्रिल २००९ - अंजली वाघमारे यांची कसाबच्या वकील म्हणून नियुक्ती* १५ एप्रिल २००९ - अंजली वाघमारे यांच्याकडून कसाबचे वकीलपत्र काढून घेतले* १६ एप्रिल २००९ - अब्बास काझमी कसाबचे नवे वकील* १७ एप्रिल २००९ - न्यायालयात कसाबचा कबुलीजबाब खुला. मात्र, त्याने तो नाकारला* २० एप्रिल २००९ - सरकारी वकिलांचे कसाबवर एकूण ३१२ आरोप* २९ एप्रिल २००९ - कसाब हा अल्पवयीन नसल्याचा तज्ज्ञांचा दावा* ६ मे २००९ - आरोप निश्चित, कसाबवर एकंदर ८६ आरोपांची निश्चिती. मात्र, त्याचा इन्कार* ८ मे २००९ - प्रथम साक्षीदाराची साक्ष, कसाबला ओळखले* २३ जून २००९ - हाफीज सईद, झकीउर रहमान लखवी यांच्यासह २२ जणांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी* ३० नोव्हेंबर २००९ - अब्बास काझमी यांच्याकडून कसाबचे वकीलपत्र काढून घेतले* १ डिसेंबर २००९ - काझमींच्या जागी के. पी. पवार यांची नियुक्ती* १६ डिसेंबर २००९ - सरकारी वकिलांकडून २६/११ खटल्याचे कामकाज पूर्ण* १८ डिसेंबर २००९ - कसाबकडून सर्व आरोपांचा इन्कार* ३१ मार्च २०१० - खटल्यातील वाद-प्रतिवाद पूर्ण. ताहिलियानींनी ३ मेपर्यंत निर्णय राखून ठेवला* ३ मे २०१० - कसाब दोषी. सबाउद्दिन अहमद आणि फहीम अन्सारी यांची दोषारोपातून मुक्तता* ६ मे २०१० - कनिष्ठ न्यायालयात कसाबला फाशीची शिक्षा* २१ फेब्रुवारी २०११ - मुंबई उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवला* मार्च २०११ - उच्च न्यायालयाच्या निर्णयाला कसाबचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान* १० ऑक्टोबर २०११ - सर्वोच्च न्यायालयाने कसाबच्या शिक्षेची अंमलबजावणी रोखली. देवाच्या नावाखाली क्रूर कृत्य करण्यासाठी आपले रोबोसारखे ब्रेनवॉशिंग केले गेल्याचा दावा करत अल्पवयीन असल्याने फाशीची शिक्षा योग्य ठरत नसल्याचा कसाबचा दावा.* १८ ऑक्टोबर २०११ - सबाउद्दिन अहमद आणि फहीम अन्सारी यांची सुटका करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी महाराष्ट्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली* ३१ जानेवारी २०१२ - आपल्यावरील खटल्याची योग्य सुनावणी झाली नसल्याचा कसाबचा दावा* २३ फेब्रुवारी २०१२ - कसाब व त्याच्या सहकाऱ्यांना पाकिस्तानातील नियंत्रण कक्षातून सूचना देणाऱ्या दहशतवाद्यांमधील संवाद सर्वोच्च न्यायालयात सादर. सीसीटीव्हीचे फुटेजही सादर.* २५ एप्रिल २०१२ - सर्वोच्च न्यायालयाने अडीच महिने निर्णय राखून ठेवला* २९ ऑगस्ट २०१२ - कसाबच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब. सहआरोपींच्या मुक्ततेवर सर्वोच्च न्यायालयही ठाम.* १६ ऑक्टोबर : कसाबचा दयेचा अर्ज फेटाळण्याची केंद्रीय गृहमंत्रालयाची राष्ट्रपतींना शिफारस. * ५ नोव्हेंबर : राष्ट्रपतींनी कसाबचा दयेचा अर्ज फेटाळला. * ८ नोव्हेंबर : राज्य सरकारला राष्ट्रपतींचा निर्णय कळविण्यात आला. * २१ नोव्हेंबर २०१२ - दहशतवादी अजमल अमीर कसाब याला पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली.