कागदावर जावली तालुक्यात सर्वत्र दारूबंदी झाली तरी दारूची नित्य विक्री सुरू असल्याबद्दल येथील व्यसनमुक्त युवक संघाने गृहमंत्री आर. आर. पाटील यांना प्रचारफेरीतच विचारणा केल्याने त्यांची चांगलीच फजिती झाली. ‘मते मागण्याचा आपल्याला नैतिक अधिकार आहे का?’ व्यसनमुक्ती संघाचे राज्याचे अध्यक्ष विलासबाबा जवळ यांनी ही प्रश्न केला.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात विलासबाबा जवळ यांनी म्हटले आहे की नतिकतेच्या आधारावर ना. आर. आर. पाटील यांनी येथील उमेदवारासाठी मते मागणे योग्य ठरते का? आम आदमी पार्टीचे उमेदवार राजेंद्र चोरगे नतिकतेच्या दृष्टीने सर्वथा योग्य उमेदवार आहेत, म्हणून आदरणीय ह. भ. प. बंडातात्या कराडकर व मी व्यसनमुक्त युवक संघाचा पािठबा राजेंद्र चोरगे यांना जाहीर केला आहे. कधी काळी आबांनाही राजकारणातील आयडॉल समजले जात होते. पण वाण नाही पण गुण लागला, या न्यायाने ते बदलले आहेत. त्यांची नतिकतेची व्याख्याही कालपरत्वे बदलली आहे. आबा तुमचा गुण इतर राजकारण्यांना लागला असता तर आम्ही धन्य झालो असतो, पण इतरांचा गुण तुम्हाला लागला याचे वाईट वाटते.
दि. १६ ऑगस्ट २००७ ते ९ जुल २००८ या २३ दिवसांच्या कालावधीत संपूर्ण जावली तालुका दारुमुक्त करण्यात महिला यशस्वी झाल्या. परंतु राज्यकर्त्यांना याचे कधी कौतुक वाटले नाही. व्यसनमुक्त युवक संघातर्फे आम्ही अवैध दारुविक्री विरोधात अनेकवेळा उपोषणे केली, आंदोलने केली; यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग होता. याबाबत गृहमंत्री म्हणून आर. आर. पाटील यांना निवेदनेही दिली. परंतु महिलांच्या दारुबंदीच्य़ा निवेदनांना केराची टोपली दाखवायचे काम ना. आर. आर. पाटील यांनी केले. त्यामुळे त्यांना मते मागण्याचाही नतिक अधिकार राहिला नाही. साता-याच्या जनतेने आता कोणता उमेदवार योग्य आहे याचा विचार करुन परिवर्तनाचा निर्णय घेतला आहे. हवे तर आबांनी येथील चार सर्वसामान्य मतदारांशी संवाद साधून त्यांच्या मनात काय आहे याची चाचपणी करावी, असेही विलासबाबा जवळ यांनी म्हटले आहे