अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे देण्यात येणारे तेजस्विनी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

पुरस्कार विजेत्यामध्ये दिवेआगरच्या स्नेहा बाळकृष्ण बापट, पेणच्या नीरा मधुकर मधे, खोपोलीच्या विनया विलास काल्रेकर, महाडच्या डॉ. अर्चना गणराज जैन, तर अलिबागच्या योगिता तुकाराम शिळधनकर यांचा समावेश आहे.

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या परंतु प्रसिद्धीपासून दूर असलेल्या कर्तृत्ववान महिलांना अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे दरवर्षी जागतिक महिला दिनाच्या दिवशी तेजस्विनी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

यंदाचा तेजस्विनी पुरस्कार वितरण समारंभ ९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पी. एन. पी. एज्युकेशन सोसायटी, मुख्य प्रशासकीय कार्यालय सभागृह, राऊतवाडी, वेश्वी, तालुका – अलिबाग येथे आयोजित करण्यात आला आहे.

रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली – उगले, रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती चित्रा पाटील, पी. एन. पी. एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, युवती राष्ट्रवादी काँग्रेस कोकण संघटक आदिती तटकरे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.