अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय आणि महाविद्यालयाजवळच्या नाल्यात एक नवजात अर्भक सापडले. डुकरांनी अर्भकाचे लचके तोडलेले असल्यामुळे ते मुलीचे आहे की मुलाचे याची माहितीही मिळालेली नाही.

स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेजच्या परिसरात एक नाला आहे. ज्याच्या शेजारी निवास व्यवस्था देखील आहे. सकाळी या नाल्यात डुकरांनी गोंगाट सुरु केला. डुकरांच्या गोंगाटामुळे नाल्यात नवजात अर्भक असल्याचे समजले. या अर्भकाला बाहेर काढण्यात आले. मात्र, डुकरांनी त्याचे लचके तोडले असल्यामुळे नेमकं अर्भक मुलाचे आहे की मुलीचे याची माहिती मिळालेली नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.