राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे सत्तास्थान असलेल्या इस्लामपूर नगरपालिकेत त्यांना आव्हान देण्यासाठी स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधकांनी एका झेंडय़ाखाली येण्याचा निर्णय घेतला आहे.

Baban Gholap, Shinde group,
माजी मंत्री बबन घोलप यांचा शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय
BJP leader conspiracy behind Arvind Kejriwal arrest
केजरीवालांच्या अटकेमागे भाजप नेत्याचे कारस्थान! संजय सिंह यांचा आरोप
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : त्रासाची जबाबदारी स्वीकारली नाही
vijay shivtare
निनावी पत्राद्वारे शिवतारेंच्या माघारीवर टीका; पवारांच्या विरोधातील ५ लाख ८० हजार मतदारांनी करायचे काय?

जिल्ह्य़ातील लक्षवेधी नगरपालिका निवडणुकीत इस्लामपूरचा समावेश असून या ठिकाणी  पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाकडेच कायम सत्ता राहिली आहे. या वेळी नगराध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले असल्याने दुसऱ्या फळीतील अनेक कार्यकत्रे या पदासाठी इच्छुक आहेत. नेमक्या याच स्थितीचा लाभ आ. पाटील यांच्या सर्व पक्षातील विरोधकांनी उठविण्याचे निश्चित केले. यासाठीची एक बठक नुकतीच खा. राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत पालिका निवडणुकीसाठी जयंत पाटील यांच्याविरुद्ध (राष्ट्रवादी) सर्वपक्षीय आघाडी करण्याचे ठरविण्यात आले. मात्र निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवायची की आघाडीच्या माध्यमातून, याबाबतचा निर्णय पुढच्या बैठकीत घेण्यात येणार आहे.