उत्तरप्रदेशची निवडणूक जिंकण्यासाठी कर्जमाफीची घोषणा मोदी करतात. निवडून आल्यानंतर आठ दिवसात कर्जमाफी केली जाते. आमच्या सरकारला कर्जमुक्ती देण्यासाठी धाड भरली आहे. हे जाणीवपूर्वक केले जात आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या जागा करणे मुश्कील आहे. जनतेसाठी सत्तेत आहोत. प्रश्न सुटणार नसतील, मुख्यमंत्री ऐकणार नसतील, तर सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय पक्षप्रमुख घेतील, असे खासदार आनंदराव अडसूळ यांनी स्पष्ट केले. खासगी हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, नोटबंदीचा बँकावर परिणाम झाला. ज्या बँकांनी चुका केल्या, त्यांच्या चौकशी लावा, कारवाई करा. पण ज्या चांगले काम करत आहेत, त्यांना भरुदड का. कोकणात सोने तारण मोठय़ाप्रमाणात घेतले जाते. नोटाबंदीमुळे त्या कालावधीत व्यवहारांवर परिणाम झाले. शासनाकडे कर्जमाफी नव्हे कर्जमुक्तीसाठी शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मागणी केली. काँग्रेस सरकारच्या कालावधीत शिवसेनेने राज्यात सभा घेतल्या. त्यामुळे नाईलाजास्तव कर्जमाफी करावी लागली.

सध्या राज्यात आत्महत्या सुरुच आहेत. शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी कायमस्वरुपी कर्जमुक्त केले पाहिजे. तरच शेतकर्याला फायदा होईल. शिवसेनेने गावागावात अभियान सुरु केले असून शेतकऱ्यांची माहिती गोळा केली जात आहे. २५ जूनपर्यंत हे अभियान सुरु राहिल. माहिती गोळा केल्यानंतर शिवसेना कर्जमाफीसाठी जोर लावेल. सत्तेतून बाहेर पडणार का या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, सरकारमध्ये आहोत म्हणजे आमच्या जबाबदार्या संपलेल्या नाहीत. आम्ही सत्तेत असल्यापासून विविध मुद्दे मांडले आहेत. माजलेल्या हत्तीला माऊथ अंकुश लावतो आणि नियंत्रणात आणतो. तीच भूमिका सध्या आम्ही बजावत आहोत. भूविकास बँकेची मालमत्ता विकून कर्मचार्याचे पगार देण्याच्या निर्णयाला तत्वत मंजूरी दिली आहे. त्याची अंमलबजावणी होईल. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मालमत्ता विकण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार हे सहकार क्षेत्रातील नेते आहेत. ते मोदींच्या जवळचे आहेत; मात्र शेती कर्जमुक्ती किंवा सहकारी बँकांबद्दल ते पंतप्रधान मोदींना माहिती देत नाहीत, अशी खंत खासदार अडसूळ यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, बारामतीमध्ये ते मोदींबरोबर एका व्यासपिठावर बसतात. पवारांना पद्मश्रीही दिला. एवढे जवळ असून महाराष्ट्रातील शेतकर्याची समस्या ते मांडत नाहीत. यावर सभागृहात आम्ही बोलतो. पण त्याचा काहीच उपयोग होत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथविधीसाठी आजूबाजूच्या राष्ट्राध्यक्षांना बालावून नवीन पायंडा पाडला. परदेशी दौर्यामुळे देशाची प्रतिमा चांगली झाली आहे. अमेरिकेमध्ये पंतप्रधानांना सन्मान मिळाला. स्वच्छता अभियान राबविले. हाता झाडू घेऊन त्यांनी नाटक केलं. हा निर्णय चांगला होता; मात्र ते अभियान तळागाळात यशस्वी झालेले नाही. जनधन योजनेमुळे १९ लाख बँक खात्यात ३२ हजार कोटी जमा झाले. जनौषधी योजनेमुळे जेनरीक वैद्यकीय दुकाने शहरांमध्ये दिसू लागली. तीन हजारपकी दिड हजार दूकाने सुरु झाली आहेत. मात्र त्यातही सत्ताधारी कार्यकर्त्यांना प्राधान्य देत आहेत. कमी किमतीमध्ये लोकांना औषधे मिळत आहेत, असे अडसूळ यांनी सांगितले.