कंधार शहरालगत असलेल्या मानसपुरी गावाच्या शिवारात शेतीची मशागत करत असताना पुरातन मंदिर जमिनीखाली बुजवलेल्या अवस्थेत आढळले. त्याचे उत्खनन केले असता गर्भगृहासहित महादेवाची भव्य िपड असलेले शिव मंदिर दिसून आले. मंदिरास पाहण्यासाठी व दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. मानसपुरीत या पूर्वीही काही ऐतिहासिक मूर्ती आढळल्या आहेत.

कंधारच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यापासून जवळच असलेल्या मानसपुरी येथील भगवान मानसपुरे यांच्या शेतात जेसीबीद्वारे शेतीचे सपाटीकरण करणे चालू होते. शेताच्या एका कोपऱ्यात मातीचा ढिगारा होता, त्यामुळे बरीचशी जमीन व्यापली गेली होती. त्या ढिगाऱ्यास समांतर करण्याच्या दृष्टीने साफसफाई करताना मोठमोठय़ा दगडी शिळा लागल्या. या शिळा घडवलेल्या असल्याचे लक्षात येताच भगवान मानसपुरे यानी सावकाश त्या बाजूस सरकवल्या असता त्यांना भुयार किंवा मोठा हौद असल्याचा अंदाज आल्यानंतर वरील सर्व माती बाजूला केल्यावर मंदिर असल्याचे लक्षात आले. काळजीपूर्वक त्यातील माती काढल्यावर त्या ठिकाणी सुंदर, सुबक घडीव अशी िपड दिसली. या िपडीची उंची ३ फूट व लांबी रुंदी ४ बाय ४ असून हा शिविलग चौकोनी आकाराचे आहे, गर्भगृह ८ बाय ८ असून गर्भगृहाची उंची ८ फूट आहे. याचा दरवाजा (प्रवेशद्वार) कोरीव नक्षीकाम केलेला आहे. या मंदिरास रंगकाम केल्याचे आढळून आले आहे. याच्या आतून व बाहेरून गेरू (लालसर रंग) लावण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे, मंदिर जमिनीच्या खाली पूर्णपणे बुजलेल्या अवस्थेत होते. या मंदिर परिसरात बागेतील आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवीचे मंदिर आहे. तसेच याच मंदिराच्या बाजूस १९८४ साली क्षेत्रपालाची १०० फूट उंचीची भव्य मूर्ती सापडलेली होती. याच भागात पुरातन मोठे तळे होते, असे सांगितले जाते; पण आज या ठिकाणी मोठे सपाट मदान असल्याचे दिसते. एकतर हे तळे नष्ट झाले.

Know the history behind the historic temple dedicated to Yamraj, which Kangana Ranaut visited
कंगना रणौतने निवडणुकीतील यशासाठी घातले साक्षात यमराजालाच साकडे; काय आहे गूढ यमराज मंदिराचा इतिहास?
bhau rangari ganpati temple fire marathi news
भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळील जुन्या लाकडी वाड्याला आग
dombivli marathi news, pedestrian bridge on railway line
डोंबिवलीतील गणपती मंदिराजवळील रेल्वे मार्गावरील पादचारी पूल धोकादायक; १ एप्रिलपासून डोंबिवली पूर्व-पश्चिमेकडे जाण्याचा मार्ग बंद
Hanuman mandir in pakistan | A 1500 Year Old Shri Panchmukhi Hanuman Mandir Is In Karachi Pakistan
पाकिस्तानातील १५०० वर्षे जुने श्री पंचमुखी हनुमानाचे मंदिर तुम्हाला माहितीये का?

त्या वेळी हे मंदिर जमिनीखाली गाडले गेले असेल किंवा आक्रमणाच्या भितीने यास जमिनीखाली गाडले गेले असावे, असे दिसते. या मंदिराच्या रचनेवरून हे मंदिर इ.स. नवव्या शतकतील असावे, असा अंदाज आहे.