मालवण तालुक्यातील मसुरे-आंगणेवाडी येथील  देवी भराडी मातेचा वार्षिक  जत्रोत्सव २ मार्च रोजी आहे. या जत्रोत्सवात लाखो भाविक उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतात. लाखो भाविकांनी स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. या देवीच्या दर्शनासाठी दोन रांगांमधून भाविकांना जाण्याची सोय करण्यात आली आहे. दर्शन अर्धा तासांत करता येईल, असे नियोजन आंगणे कुटुंबीयांनी केले आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सुमारे ३० सीसी टीव्ही कॅमेऱ्याद्वारे दक्षता घेण्यात येणार आहे.

आंगणेवाडीत महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्यातून भाविक देवीदर्शनासाठी येतात. मुंबईमधून चाकरमानी मोठय़ा प्रमाणात देवीच्या दर्शनासाठी येतात. देवीचा उत्सव तीन दिवस चालतो, पण भाविकांची गर्दी २ मार्च रोजी मोठय़ा प्रमाणात असणार आहे.

mahavir jayanti celebration marathi news
सांगली: भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी
chhattisgarh s Elephant Family, Settles in Maharashtra, female elephant, give birth to calf, gadchiroli district , gadchiroli elephant born, elephant news, gadchiroli news, marathi news, animal news,
VIDEO: छत्तीसगडच्या मादीने महाराष्ट्रात दिला पिल्लाला जन्म, ‘प्ररप्रांतीय’ हत्तींचा कुटुंबकबिला विस्तारला…
Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून
Meteorological department predicted heat wave in Raigad Thane Palghar along with Mumbai Pune
मुंबईसह रायगड, ठाणे, पालघरमध्ये उकाडा वाढणार; यवतमाळ, अकोला, चंद्रपुरात तीन दिवस उष्णतेची लाट

या यात्रेसाठी पोलीस व होमगार्ड मिळून ३५० कर्मचारी सुरक्षिततेसाठी असणार आहे. राज्यातील मंत्रिमंडळातील मंत्री, विरोधी पक्षाचे नेते, मुंबई महापालिकेचे नेते या उत्सवात दर्शनासाठी हजेरी लावतात. पूर्वी मुंबईतील गुन्हेगार क्षेत्रातील अनेकजण देवीच्या दर्शनाला हमखास उपस्थित राहत होते.

श्री देवी भराडीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सरबत, आरोग्य तपासणी अशा सुविधादेखील राजकीय पक्ष देत असतात. जिल्ह्य़ातूनदेखील मोठय़ा प्रमाणात भाविक उपस्थिती दर्शवितात.

महाडचा छबिनाउत्सव उत्साहात साजरा

अलिबाग : संपूर्ण कोकणात प्रसिद्ध असलेला महाडचा श्री विरेश्वर महाराजांचा छबिनोत्सव पारंपरिक पद्धतीने मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या आठ दिवसांपासून सुरू झालेल्या या उत्सवाची  लळीतच्या किर्तनाने आज सकाळी सांगता करण्यात आली.

महाडकरांचं आराध्यदैवत श्री विरेश्वर महाराजांच्या या छबिना उत्सवानिमित्त भरलेल्या यात्रेला लाखो भाविकांनी उपस्थिती लाभली होती. काल मंगळवारी रात्रीपासून तालुक्यातील विविध गावाच्या ग्रामदेवता आपल्या लाडक्या विरेश्वरांच्या भेटीला पालखीने वाजत गाजत येतात. त्यात विन्हेरेच्या श्री झोलाई देवीचे आगमन महत्त्वपूर्ण मानले जाते. मध्यरात्री विन्हेरच्या झोलाई देवीचे ढोल नगाऱ्याच्या निनादात स्वागत केले जाते. त्यानंतर विरेश्वर मंदिराक गोंधळ व अन्य धार्मिक विधी पार पडल्यानंतर सर्व देवदेवता व विरेश्वर महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात येते. मध्यरात्रीनंतर पहाटे निघालेल्या मिरवणुकीत नासण काठय़ा नाचवण्याचा क्षण मोठे आकर्षण ठरते.

गाडीतळ परिसरात भरलेल्या यात्रेत उंचच उंच आकाशपाळणे, मौतका कुंवा आदी मनोरंजनाची साधने व मोठय़ा प्रमाणावर वेगवेगळी दुकाने आलेली होती. विरेश्वर मंदिरात तर दर्शनासाठी भाविकांची अक्षरश: झुंबड उडाल्याचे दिसून आले.

उत्सव शांततेत पार पडण्यासाठी डिवायएसपी प्रांजली सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. रविंद्र शिंदे, केटी गावडे आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तात तैनात होते. देवस्थानचे सरपंच दिलीप पार्टे, छबिना उत्सव समितीचे अध्यक्ष संजय पवार यांच्यासह सर्व विश्वस्त व उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी उत्सव यशस्वीपणे पार पडण्यासाठी परीश्रम घेतले.