प्रख्यात निरुपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पत्नी अनिता धर्माधिकारी यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या ६३ वर्षांच्या होत्या. पुण्यातील राहत्या घरी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
अनिता धर्माधिकारी यांचा जन्म २२ सप्टेंबर १९५२ साली मंडणगड येथे झाला होता. १९७४ साली त्यांचा विवाह निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याशी झाला. निरुपणाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाच्या कार्यात त्यांनी अप्पासाहेबांना मोलाचे सहकार्य केले होते. बैठकांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे यासारख्या उप्रकमात त्यांचे श्रीसंप्रदायाला मौलिक मार्गदर्शन मिळत आले होते. त्यामुळे त्यांना माई नावानेही संबोधले जात होते. त्यांच्या पश्चात तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात रायगड जिल्ह्यावर शोककळा पसरली. जिल्ह्यातील विविध भागातून श्री संप्रदायाचे हजारो दासगण रेवदंड्यात दाखल झाले. शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर रेवदंड्यातील हरेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
anita2यावेळी रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता, एकनाथ शिंदे, माजी आमदार मीनाक्षी पाटील, आमदार पंडीत पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार भरत गोगावले, माजी आमदार मधुकर ठाकूर जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

shrikant shinde s work report marathi news
श्रीकांत शिंदे यांच्या कार्यअहवालावर राज ठाकरे यांची छबी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी डोंबिवलीत प्रकाशन
wardha lok sabha constituency, Amar Kale, sharad pawar ncp, amra kale campaign, Faces Setback , Complaints of Financial Mismanagement, amar kale not spending money, finance in campaign,
वर्धा : ‘हवेत राहू नका ‘, अमर काळे यांना सहकाऱ्यांचा इशारा
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या जन्मगावातील लोक म्हणतायत…