29 April 2017

News Flash

भंडाऱयामध्ये आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार

भंडाऱयामध्ये तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका

नागपूर | Updated: February 23, 2013 11:29 AM

भंडाऱयामध्ये तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. १४ वर्षांच्या मुलीवर शिक्षकाने शाळेच्या आवारातच दोन दिवसांपूर्वी बलात्कार केला.
लाखंदूर तालुक्यातील गोलाटी गावातील शाळेमध्ये यादव बोरकर नावाच्या शिक्षकाने हे लज्जास्पद कृत्य केले. याप्रकरणी शुक्रवारी उशीरा तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर यादव स्वतः पोलिसांपुढे हजर झाला. त्याला लगेचच अटक करण्यात आली. १४ फेब्रुवारीलाच ६, ९ आणि ११ वर्षांच्या तीन मुली मुरवाडी गावातून गायब झाल्याचे आढळून आले. या मुलींवर बलात्कार झाल्याचे आणि त्यांची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकल्याचे तपासात आढळून आले होते. पोलिसांनी अजून याप्रकरणी कोणालाही अटक केलेली नाही.
(छायाचित्र संग्रहित असून, घटनेचा त्याच्य़ाशी संबंध नाही) 

First Published on February 23, 2013 11:29 am

Web Title: another rape case involving minor victim in bhandara
टॅग Abuse,Bhandara,Rape
  1. No Comments.