मालवण तालुक्यातील आचरा गावच्या व्यापारी संघटनेची सभा सुरेश हडकर यांच्या अध्यक्षतेखाली आचरा तिठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सभागृहात नुकतीच संपन्न झाली. या सभेत आचरा व्यापारी संघटनेच्या कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. अध्यक्ष- अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष-अभिजीत सावंत, विजय लाड, सचिव- संदीप पांगम, सहसचिव- शैलेश शेटय़े, खजिनदार- जयप्रकाश ऊर्फ बाबू परुळेकर, कार्यकारिणी सदस्य- मंगेश टेमकर, विद्यानंद परब, मांगिरील सांबारी, विजय कदम, अमित गांवकर, बाळू वस्त, गिरीश माटवकर, प्रफुल्ल घाडी, रूपेश हडकर, भरत पटेल, पंकज घारे. सल्लागार- श्रीकांत सांबारी, सुरेश हडकर, विनायक परब, राजन पांगे, दिलीप कावले,जैरॉन फर्नाडिस, सुभाष नलावडे.