जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेस नेते अशोक भांगरे यांनी पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा देत भगवा झेंडा हाती घेतला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज त्यांनी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला.
भांगरे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे अकोल्यात विधानसभेला पुन्हा एकदा पिचड-भांगरे ही पारंपरिक लढत होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी शिवसेनेच्या उमेदवारीसाठी मागील वेळेप्रमाणेच अशोक भांगरे व मधुकर तळपाडे यांच्यात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्याविरुध्द मागील सलग पाच निवडणुकांमध्ये विधानसभेला भांगरे यांना पराभव पत्करावा लागला होता. या पाच निवडणुका त्यांनी वेगवेगळ्या चिन्हावर लढविल्या. सन २००४ मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवताना त्यांनी पिचड यांना कडवी लढत दिली होती. मात्र त्यानंतर शिवसेनेबरोबरचे भांगरे यांचे संबंध बिघडत गेले. त्यामुळे २००९ ला त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांनी मनसेच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढविली मात्र ते तिस-या क्रमांकावर फेकले गेले. लोकसभा निवडणुकीपासूनच भांगरे यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा होती. त्या वेळी त्यांनी अंतिम टप्प्यात महायुतीचे उमेदवार  सदाशिव लोखंडे यांना मदत केली. आज त्यांना मुंबई येथे पाचारण करण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी मातोश्रीवरच शिवसेनेत प्रवेश केला.

Ambadas Danve on asaduddin owaisi
‘खान पाहिजे की बाण?’, बाळासाहेबांची ही भूमिका उबाठा गटाने का बदलली? अंबादास दानवेंनी केलं स्पष्ट
Narendra Modi criticism that Shiv Sena is fake with Congress
काँग्रेसबरोबर नकली शिवसेना! नरेंद्र मोदी यांची टीका, चंद्रपुरात पंतप्रधानांची पहिली प्रचार सभा
Congress Kolhapur
काँग्रेसशी मैत्री पुरे ! कोल्हापुरातील सेनेच्या दोन्ही खासदार, पालमंत्र्यांना भाजप कार्यकर्त्यांनी सुनावले
Sangli Lok Sabha candidacy Congress workers focus on Delhi decision
सांगली लोकसभा उमेदवारी काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष दिल्लीच्या निर्णयाकडे