कृष्णद्रव्याने पूर्णपणे भरलेली दीर्घिका खगोलवैज्ञानिकांना सापडली असून, कृष्णद्रव्य कधी दिसत नसते, पण विश्वाचा ९० टक्के भाग त्याने व्यापलेला आहे. ड्रॅगनफ्लाय ४४ असे या दीर्घिकेचे नाव असून, ती आकाराला आकाशगंगेएवढी आहे. अरुंधती केश तारकासमूहात ही दीर्घिका असून ती गेल्या वर्षीपासून तिच्या वेगळय़ा रचनेमुळे सापडली नव्हती. आकाशगंगेच्या आकाराची ही दीर्घिका असून त्यात फार कमी तारे आहेत.

ही दीर्घिका सापडल्यानंतर तिच्यात नजरेला दिसण्यापेक्षा इतर बरेच काही आहे, असे येल विद्यापीठाचे खगोलशास्त्रज्ञ पीटर व्हॅन डोकुम यांनी सांगितले. या संशोधक चमूने ड्रॅगनफ्लाय ४४ दीर्घिकेची छायाचित्रे टिपली असून, ती डब्ल्यू. एम. केक वेधशाळा व हवाईतील जेमिनी नॉर्थ टेलिस्कोप या दुर्बिणींनी त्याचे निरीक्षण करण्यात आले होते. सहा रात्री निरीक्षण करून या दीर्घिकांच्या ताऱ्यांचे वेग मोजले जातात. ताऱ्यांच्या गोलाकार प्रकाशमान वलयाचा यात विचार केला जातो. आपल्या आकाशगंगेभोवती एक प्रभामंडल आहे तसेच या दीर्घिकेभोवती आहे. ताऱ्यांचा वेग हा दीर्घिकेचे वस्तुमान दर्शवणारा असतो. तारा जितका वेगाने फिरतो तितके दीर्घिकेचे वस्तुमान जास्त असते. आताच्या दीíघकेतील तारे खूप वेगाने फिरत आहेत. त्याचा अर्थ ड्रॅगनफ्लायवर न दिसणारे बरेच वस्तुमान आहे. असे टोरांटो विद्यापीठाचे रॉबटरे अब्राहम यांनी सांगितले. या दीर्घिकेचे वस्तुमान सूर्याच्या एक ट्रिलीयनपट जास्त तर आकाशगंगेइतकेच आहे.

ताऱ्यांच्या निर्मितीत ९९.९ टक्के वस्तुमान हे कृष्णद्रव्याचे असते, ते दिसत नसते, पण विश्वाचा ९० टक्के भाग त्याचाच बनलेला आहे. कृष्णद्रव्याने भरलेल्या दीर्घिकांचा शोध हा तसा नवा भाग नाही. अतिशय फिकट बटू दीर्घिकांची रचना सारखीच आहे. पण त्या दीर्घिका ड्रॅगनफ्लाय ४४ पेक्षा १० हजारपट कमी वस्तुमानाच्या आहेत. यातील तारकासमूह हे अतिशय घट्ट गुच्छासारखे आहेत. अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.