मागासक्षेत्र योजनेचा जिल्ह्यात साफ बोजवारा उडाला असून, योजना बंद होण्याच्या वाटेवर असताना १२ कोटींचा धुळखात पडलेला निधी परत जाण्याच्या वाटेवर आहे. सद्यस्थितीत सुरू कामे मे अखेपर्यंत पूर्ण करावीत, सुरू न झालेली कामे रद्द करून जिल्हास्तरावर निधी परत पाठवावा, झालेल्या कामांचे प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्याने निधीच्या खर्चाची जुळवा-जुळव करण्यात यंत्रणेची पुरती दमछाक होत आहे. गरप्रकार झालेल्या कामावरील निधी वसुलीचे आव्हान यंत्रणेला पेलवणार का, हा सध्या चच्रेचा विषय आहे.
मागास असलेल्या या जिल्ह्य़ाच्या विकासासाठी मागासक्षेत्र अनुदान निधीतून ग्रामीण भागात पाणीपुरवठा, रस्ते, संरक्षक िभत, अंगणवाडी इमारत आदी विकासकामे करून घ्यायची जवाबदारी जिल्हा ग्रामीण यंत्रणेवर होती. परंतु अनेक कामे कागदोपत्री, तर काही कामे अपूर्ण आहेत. निधी खर्च करताना यंत्रणेची उदासीनता हेच मुख्य कारण असल्याने योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र संपूर्ण जिल्हाभर आहे. ही योजना ऑगस्टअखेर बंद होण्याच्या वाटेवर असताना धुळखात पडलेला निधी खर्चण्याचे आवाहन यंत्रणेला पेलवणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या पाश्र्वभूमीवर ग्रामविकास जलसंधारण विभागाच्या प्रधान सचिवांनी पुणे येथे १७ एप्रिलला बठक घेतली. योजनेंतर्गत सध्या सुरू असलेली कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करावीत. जी कामे अजून सुरू झाली नाहीत, ती तातडीने रद्द करून या कामावरील निधी जिल्हास्तरावर जमा करावा. तसेच २००९-१० ते २०१४-१५ या आर्थिक वर्षांत प्राप्त निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र ३० जूनपूर्वी सादर करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्यामुळे यंत्रणेने केलेल्या कामाचे िबग फुटणार का, असे चित्र निर्माण झाले आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे पूर्वीची जमा धरून सुमारे १२ कोटींवर निधी धुळखात पडून आहे. चालू आíथक वर्षांत योजनेला ११ कोटींचा निधी ऑगस्टमध्ये प्राप्त झाला. मात्र, निधीचे वाटप जानेवारीत झाले. परंतु कामे पूर्ण करून घेण्याकडे यंत्रणेचे दुर्लक्षच झाले. यास विविध कारणे अपवाद ठरतात. अनेक गावांना वारंवार निधी वितरित करण्यात आला, तर काही ग्रामपंचायतींनी कागदोपत्रीच कामे दाखवून निधीत गरव्यवहार केल्याच्या तक्रारीत वाढ होत गेली.
वादग्रस्त ठरलेली कामे
सन २००९-१० मध्ये कलगाव स्मशानभूमीत शेड बांधकामासाठी ३ लाख निधी वितरित करण्यात आला. भटसावंगी ग्रामपंचायतीला २ लाख ८८ हजार, असोंदा संरक्षण िभत २ लाख ४६ हजार, लोहरा बु. वाचनालय २ लाख १९ हजार, माथा सामूहिक केंद्र ३ लाख १० हजार, सोनसावंगी सिमेंट रस्ता १ लाख ११ हजार, खैरखेडा ग्रामपंचायत ३ लाख ९९ हजार, २०१०-११ मध्ये सवना ग्रामपंचायतीला ५ लाख, तर वलाना ग्रामपंचायतीला संरक्षण िभतीसाठी ७७ हजारांचा निधी वितरित करण्यात आला. २०११-१२ मध्ये िहगणी येथील सिमेंट रस्ता २ लाख २१ हजार, राहुली खुर्द सौरदिव्यांसाठी १ लाख ५७ हजार, बासंबा स्मशानभूमी शेड १ लाख ८९ हजार, २०१२-१३ मध्ये चिमेगाव शाळेची संरक्षण िभत १ लाख ४१ हजार, धार येथील शाळा संरक्षण िभतीसाठी १ लाख ६१ हजार, गोजेगाव शाळा संरक्षण िभत १ लाख ९९ हजार, २०१३-१४ मध्ये सिमेंट रस्त्यासाठी चिमेगाव १ लाख ५९ हजार, धार १ लाख ८७ हजार, गोजेगाव २ लाख ४० हजार या प्रमाणे निधी वितरित केला. मात्र, धार, चिमेगाव, गोजेगाव या तीन ग्रामपंचायतींना दोन वेळा निधी प्राप्त झाला.
या ग्रामपंचायतींना विविध कामांसाठी निधी वितरित केला. परंतु त्या ग्रामपंचायतींनी खर्च केलेला निधी वादग्रस्त ठरला. त्यामुळे निधी खर्चावर वारंवार तक्रारी येऊनही जिल्हा ग्रामीण यंत्रणा चौकशी न करता त्याकडे डोळेझाक करीत असल्याने निधीच्या खर्चावरून वादाला तोंड फुटले आहे.