राज्यातील पहिल्याच बहुजन मोर्चाला मोठा प्रतिसाद

दलित, भटके व ओबीसी समाजातील विविध संघटनांनी एकत्र येत सोमवारी नगरमध्ये काढलेल्या पहिल्याच बहुजन क्रांती मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. निळे, पिवळे, लाल, पांढरे झेंडे घेत, विविध मागण्यांचे फलक फडकवत, ‘एकच पर्व-बहुजन सर्व’ अशा टोप्या परिधान केलेले, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या कडक अंमलबजावणीच्या घोषणा देत बहुजनांचा मोठा जनसागर रस्त्यावर उतरला होता. नियोजित वेळेपेक्षा मोर्चा काहीसा दिरंगाईने निघाला, मात्र मोर्चेकऱ्यांनी शिस्तीचे दर्शन घडवले. मोर्चातील महिला व मुलींची संख्याही लक्षणीय होती. स्वयंसेवकांच्या मदतीमुळे पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताणही काहीसा हलका झाला.

Loksatta chaturanga Discovery of Women Vote Bank
महिला व्होट बँकेचा शोध!
india demand of land marathi news
कार्यालयीन जागांच्या मागणीत ४३ टक्के वाढ, पहिल्या तिमाहीत १.६२ कोटी चौरस फुटांचे व्यवहार; बंगळूरुचा सर्वाधिक वाटा
Mukesh Ambani
जागतिक महाश्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी नवव्या स्थानी; देशातील धनाढ्याच्या संपत्तीत वर्षभरात ४१ टक्क्यांची वाढ
ILO report
विश्लेषण : देशातील बेरोजगारांमध्ये ८३ टक्के तरुण! ILO च्या अहवालामध्ये आणखी कोणता धक्कादायक तपशील?

मोर्चात सर्वाधिक संख्या होती ती निळय़ा झेंडय़ांची. पोलिसांनी शहरातून जाणाऱ्या आठही राज्यमार्गावरील वाहतूक सोमवारी शहराबाहेरून वळवली होती. त्यामुळे मोर्चेकऱ्यांचे जथ्थे, शहरातील वाडिया पार्क संकुलातील नियोजित स्थळी पोहोचण्यास विलंब झाला. दुपारी बाराच्या सुमारास गर्दी होऊ लागली. सात वक्त्यांची भाषणे झाल्यावर एकच्या सुमाराला मोर्चास सुरुवात झाली. जोरदार घोषणा देत निघालेला मोर्चा जुने बसस्थानक चौक-बाजार समिती चौकांतून सरळ रस्त्याने पाऊण तासाने चांदणी चौकात धडकला. तेथे काही आयोजकांची भाषणे झाली. हा मोर्चा ‘बोलका’ होता. त्यामुळे त्यात विविध घोषणा देण्यात आल्या.

प्रा. किसन चव्हाण यांनी मागण्यांच्या निवेदनाचे वाचन केले. प्रा. रत्ना वाघमारे यांनी संविधानाचे वाचन केले. राष्ट्रगीताने मोर्चाची सव्वादोनच्या सुमारास सांगता करण्यात आली. त्याच वेळी खडर्य़ातील (ता. जामखेड) घटनेत बळी ठरलेल्या नितीन आगे याचे वडील साहेबराव आगे, शिर्डीत बळी गेलेल्या सागर शेजवळ याची आई अनिता शेजवळ, बहीण अश्विनी व भाऊ आकाश यांच्या उपस्थितीत अशोक गायकवाड, विजय वाकचौरे, अजय साळवे, नितीन कसबेकर, शिवाजी ढवळे, पोपट सरोदे, राम साबळे, डॉ. मेधा कांबळे, गंगू गवळी, जयंत गायकवाड आदींनी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना मागण्यांचे निवेदन दिले. कवडे यांनी मोर्चेकऱ्यांच्या भावना व मागण्या सरकारला कळवण्याचे आश्वासन दिले.

मोर्चाच्या मागण्या

अ‍ॅट्रॉसिटीची कडक अंमलबजावणी करा, त्याकरिता स्वतंत्र न्यायालय व स्वतंत्र योजना निर्माण करा. ख्रिश्चनांना अ‍ॅट्रॉसिटी व आरक्षणाचे संरक्षण द्या, दलित आदिवासींचा वापर करून अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा, महिला अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदे करा, कोपर्डीच्या आरोपींना फाशी द्या, ओबीसींची जातवार जनगणना करा, कैकाडी समाजावरील बंधने हटवा, राखीव जागा भरा, मुस्लिमांना सच्चर कमिशन लागू करा, भूमिहीनांना जमीन वाटप, शेतमालाला हमीभाव, ओबीसी-मुस्लीम व भटक्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद, शिष्यवृत्तीत वाढ, वतनी जमिनी परत करा, बाबासाहेब पुरंदरेंचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार काढून घ्या, आदी २१ मागण्या करण्यात आल्या.

५३ संघटनांचा सहभाग

रिपब्लिकन पक्ष (आठवले व गवई गट), भारतमुक्ती मोर्चा, टायगर फोर्स, एकलव्य संघटना, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी, चर्मकार संघ, लोकाधिकार आंदोलन, समता परिषद, ओबीसी समाज संघटना, दलित महासंघ, चर्मकार महासंघ, कास्ट्राईब संघटना, मांगगारुडी समाज संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, आदिवासी पारधी समाज संघटना, लाल निशाण पक्ष, नरवीर उमाजी नाईक समाज संघटना, नाभिक सेवा संघ, मातंग एकता संघ, वडार समाज संघटना, ख्रिश्चन समाज संघटना, राष्ट्रीय मुस्लीम मंच, भटक्या विमुक्त जाती संघटना, राष्ट्रीय किसान मोर्चा, बारा बलुतेदार संघटना, मेहतर वाल्मीकी संघटना, वैदू समाज संघटना, बहुजन विद्यार्थी परिषद, भारतीय विद्यार्थी मोर्चा, बहुजन समाज पक्ष, गुरव समाज संघटना, निराळी समाज संघटना, अठरापगड सामाजिक संघटना, कंजारभाट सामाजिक संघटना, ठाकर समाज संघ, कैकाडी समाज संघटना, कोल्हाटी समाज संघटना, कुंभार समाज संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय सेल, धोबी परीट समाज संघटना, सुवर्णकार समाज संघ, बौद्ध महासभा, ओबीसी समाज संघटना, चर्मकार विकास संघ, राष्ट्रीय चर्मकार समाज परिषद, चर्मकार विकास संघ, पीपल्स रिपब्लिकन पार्टी या ५३ संघटना मोर्चात सहभागी झाल्या होत्या.