मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- द्रुतगती महामार्गावर अपघातात महाबळेश्वरच्या चौघांचा मृत्यू
- कोल्हापूरची टोल आकारणी कृती समितीच्या चर्चेनंतर- हर्षवर्धन पाटील
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- फेरतपासणीची लांबलचक प्रक्रिया टाळण्यासाठी डीन समितीच्या सूचना
- व्यावसायीकरणामुळे माध्यमे वास्तवापासून दूर -पी. साईनाथ
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
चिपळूण येथे होणाऱ्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रणपत्रिकेत परशुरामाचे चित्र व कुऱ्हाड छापणे हा जातीय वर्चस्व प्रस्थापित करण्याचा डाव असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला असून, आयोजकांनी माफी मागून ही चित्रे काढली नाही तर संमेलन उधळून लावण्याचा इशारा संघटनेने पत्रकार परिषदेत दिला. याचबरोबर मराठा महासंघ व छावा संघटनांनीही याचा निषेध केला आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड व प्रदेश कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, महाराष्ट्र शासन फुले-शाहू-आंबेडकरांच्या समता, न्याय, बंधुता व स्त्री समानता या तत्त्वांवर चालते. परशुराम हे कौर्य, हिंसा, विषमता व ब्राह्मणी वर्चस्व यांचे प्रतीक आहे. तरीसुद्धा त्याचे चित्र व संमेलनस्थळी त्याचा पुतळा उभारला जातो, हे जातीय व वर्ण वर्चस्ववाद पसरवणारे दिसते. त्यामुळे त्याला विरोध केला जात आहे. आयोजकांनी माफी मागून या गोष्टी काढल्या नाहीत, तर संमेलन उधळले जाईल, असा इशारा गायकवाड यांनी दिला.
संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, उद्घाटक कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाही याबाबत निवेदन देऊन संमेलनाला उपस्थित न राहण्याची विनंती करण्यात आली आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.




















संभाजी ब्रीगाडे व इतर तत्सम सगथाना य्हाच खर्या जातीयवादी आणी मराठा वर्चस्ववाडी असून, यांनी चालवलेला ब्राह्मण विरोधी प्रचार बघता या संघटनांवर बंदी आणून त्यांच्या नेत्यांवर विघातानावाद, देशद्रोह व गृहयुद्धाला प्रोत्साहन देणे असे गुन्हे दाखल सरकारने करावेत व कारवाई करावी.
परशुराम हे हिंसेचे क्रौर्याचे प्रतीक कसे असू शकते? सहस्र अर्जुन नावाच्या राजाला जेव्हा सत्तेचा माज चढून त्याने परशुरामाच्या वडिलांची हत्या केली आणि विद्याध्यायानाचे केंद्र असलेले आश्रम जाळले तेव्हा परशुरामाने हातात परशु घेतला आहे. परशुराम हा अन्याय विरुद्धच्या यशस्वी संघर्षाचे प्रतीक आहे. इतकेच नव्हे तर सर्व पृथ्वी जिंकल्यानंतर सत्ता आपल्याकडे न ठेवता ती वाटून टाकली म्हणून त्यागाचे प्रतीक आहे. परशुरामाने त्या काळाप्रमाणे सत्तांध सत्ताधार्यांना सत्तेवरून उतरवले. मतदानाचे हत्यार हे परशु रामाच्या परशु सारखेच आहे. सध्याच्या लोकशाहीत आपण सगळे परशुरामाच आहोत. मतदानपरशु वापरा आणि भ्रष्ट सत्ताधार्यांना धडा शिकावा हाच परशुरामाचा संदेश आहे. परशुराम हे एका जातीचे दैवत नसून तो सर्व अन्याय पीडितांचा प्रेरणा स्थान आहे.
परशुराम हा सर्वच क्षत्रियांचा शत्रू नव्हता तर फक्त उद्धट क्षत्रियांचा शत्रू होता. जेव्हा श्रीरामाने (श्रीराम क्षत्रिय होता) नम्र पणे परशुरामाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली तेव्हा परशुरामाने आपले अवतार कार्य संपविले. आजही ब्राह्मणांच्या घरात परशुराम पेक्षा रामाची पूजा होते हे सत्य आहे. कोकणच्या भूमीला परशुराम भूमी असेही म्हणतात. आणि तिथली जनता परशुरामाला खूप मानते. सर्वांनी तिथल्या स्थानिक जनतेच्या भावनांचा आदर केला पाहिजे.