गटनेत्याला सेनेची उमेदवारी

चिपळूण नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खदखदत असलेला असंतोष अखेर बाहेर उफाळून आला असून माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या निवडक कट्टर समर्थकांनी आज शिवसेनेमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. त्यापैकी गटनेते मोहन मिरगल यांना लगेच सेनेतर्फे उमेदवारीची बक्षिसीही देण्यात आली आहे. मात्र स्वत: जाधव यांनी, आपण आपल्या जागी ‘स्थिर’ असल्याचे स्पष्ट केले.

Shobha Bachhav, BJP Dhule,
धुळ्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत ? शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
jitendra kumar trivedi bjp
भाजपाच्या ‘या’ नेत्यावर तृणमूल नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप
mns trade union vice president raj parte attacked attacked with Rods and knife
मनसे कामगार सेनेच्या अंतर्गत वादातून उपाध्यक्षावर चाकू व रॉडने हल्ला; दोन पदाधिकाऱ्यांसह १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा
Karishma And Kareena Kapoor
अभिनेता गोविंदापाठोपाठ करिश्मा आणि करीनाही शिवसेनेत? एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाची शक्यता!

चिपळूण नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडीचे अधिकार पक्षाचे माजी आमदार रमेश कदम यांना देण्यात आल्याचे जाहीर झाल्यापासून पक्षकार्यकर्त्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात नाराजी होती. जिल्हाध्यक्ष शेखर निकम आणि जिल्हा प्रभारी भास्कर जाधव यांनी या निवड प्रक्रियेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांच्या कट्टर समर्थकांपैकी काही जणांनी ही नाराजी उघडपणे व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. पक्षवाढीसाठी काहीही न केलेल्यांना उमेदवार निवडीचे अधिकार दिल्याबद्दल जाधव यांचे समर्थक असलेले माजी सभापती चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मागील नगर परिषद निवडणुकीत जाधव यांच्या आशीर्वादाने स्थापन झालेल्या शहर विकास आघाडीच्या बॅनरखाली उमेदवार उभे करण्यात आले होते. त्यापैकी त्यांचे चिरंजीव समीर यांच्यासह पाच जण निवडून आले.

नगर परिषदेतील या गटाचे नेते मोहन मिरगल यांच्यासह काही प्रमुख कार्यकर्त्यांनी आज चिपळूणचे शिवसेना आमदार यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत सेनेला पाठिंबा जाहीर केला. पक्षामध्ये आपली घुसमट होत असल्याची तक्रार गेले काही महिने करीत असलेले राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान जिल्हा प्रभारी जाधव यांची पुढील चाल कशी असेल, हे या घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, शिवसेनेतर्फे आज चिपळूण नगर परिषद निवडणुकीसाठी २० उमेदवारांची घोषणा केली.