सरकारने प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रकाशित केलेल्या जाहिरातीत घटनेच्या प्रास्ताविकेतून ‘समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता’ हे शब्द जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. सरकारच्या जाहिरातीत हिंदुत्वाच्यासंदर्भात व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आले. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून हिंदुत्ववाद्यांचा जोर वाढला आहे. त्यादृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. ‘घरवापसी’सारखे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यामुळे समाजात धार्मिक तेढ वाढली आहे. मोदींनी सरकार म्हणून या उपक्रमांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केली.