भारतीय जनता पक्षाने राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून पक्षाचे नेते विनय सहस्त्रबुद्धे आणि डॉ. विकास महात्मे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातून भाजप कोणाला उमेदवारी देणार, याबद्दल गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी पक्षाने अधिकृतपणे विनय सहस्त्रबुद्धे आणि विकास महात्मे यांची नावे जाहीर केली आहेत. विधान परिषदेसाठी भाजपने आपल्या मित्र पक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असून, विधान परिषदेच्या तीन जागांसाठी पक्षाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत, शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे त्याचबरोबर भाजपचे नेते प्रविण दरेकर यांना संधी दिली आहे.