जादूटोण्याच्या संशयातून एका व्यक्तीचा खून करणाऱ्याला नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सचिन श्रीपत लोखंडे (३०, रा. भिवापूर) असे या आरोपीचे नाव आहे. जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये जन्मठेपेची शिक्षा होणारा सचिन हा पहिलाच आरोपी आहे.