दिंडोरीच्या करंजवण येथील वस्तीतील गटार योजनेच्या कामाचा प्रस्ताव मंजूर करून तो जिल्हा परिषदेकडे पाठविण्यासाठी ४० हजार रुपये स्वीकारताना गटविकास अधिकारी राजाराम झगा मोहिते यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. महत्त्वाची बाब म्हणजे, गटविकास अधिकारी शासकीय कर्मचाऱ्याकडेच लाचेची मागणी करीत होते.
या प्रकरणी मौजे करंजवण येथील ग्रामविस्तार अधिकारी यांनी तक्रार दिली. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास योजनेंतर्गत पंचशीलनगर वस्तीतील गटार योजनेच्या कामाला मंजुरी मिळण्यासाठीचा प्रस्ताव दिंडोरीच्या पंचायत समितीकडे दाखल करण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजूर करून तो जिल्हा परिषदेत पुढील मान्यतेकरिता पाठविण्यासाठी पंचायत समिती कार्यालयातील गटविकास अधिकारी राजाराम मोहिते यांनी ४० हजार रुपयांची मागणी केली. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर सोमवारी सापळा रचण्यात आला. ४० हजार रुपयांची रक्कम स्वीकारत असताना मोहितेला पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Mumbai, Redevelopment dispute,
मुंबई : सिंधी निर्वासितांच्या पुनर्विकासाचा वाद न्यायालयात
Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Nashik, Teams inspection, auction,
नाशिक : खासगी जागेवर कृषिमाल लिलावामुळे तपासणीसाठी पथके नियुक्त