मुंबई- गोवा एक्सप्रेस महामार्गावर बुधवारी कोकणात जाणाऱ्या एसटी गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एका प्रवाशाचा  मृत्यू झाला असून, १५ जण जखमी झाल्याचे समजत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वालोपेजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून एसटी १५ फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. जखमी प्रवाशांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. गणेशोत्सवानिमित्त आपल्या गावी जात असलेल्या भक्तांवर काळाने असा अचानक घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.