व्यवसाय कराच्या रकमेत जडजोड करून देण्याकरिता १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना विक्रीकर निरीक्षक शंतनू भावसार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. भावसार याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात चाळीसगाव रस्त्यावर वास्तव्यास असलेल्या शेख आबताफ  हुसेन यांनी तक्रार दिली होती. शेख यांचा बांधकाम व्यवसाय आहे. २००८ पासून त्यांच्या संस्थेला व्यवसाय कर भरणे बाकी होते. त्या अनुषंगाने ते विक्रीकर कार्यालयात गेले असताना निरीक्षक भावसारने तडजोड करून व्यवसाय कर भरण्यासाठी १२ हजार रुपयांची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात पैसे स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विजय मोरे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. लोकसेवकपदाचा दुरुपयोग करून भावसारने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून विक्रीकर निरीक्षक शंतनू भावसार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
post of Health Director City
‘आरोग्य संचालक शहर’ हे पद तीन वर्षांनंतरही कागदावरच, शहरी आरोग्याविषयी सरकार उदासीन…
Investors cheated
जादा परताव्याच्या आमिषाने गुतंवणूकदारांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक, सॅमसन युनिट्रेड कंपनीचा संचालक अटकेत