भारत संचार निगम लिमिटेड अर्थात, बीएसएनएलकडे ग्राहकांचे ३ हजार ६४९ कोटी रुपये ठेवींच्या स्वरूपात पडून असून, बीएसएनल एवढी मोठी रक्कम वर्षांनुवष्रे बिनव्याजीच वापरत आहे. बीएसएनएल आपल्या दूरध्वनी ग्राहकांकडून जी रक्कम डिपॉझिट म्हणून घेते त्या रकमेवर ग्राहकांना व्याज द्यावे, अशी मागणी केंद्रीय रसायन मंत्री हंसराज अहीर यांनी दळणवळण मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.
ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकत्रे गंगाधरपंत चिलवरवार यांनी यासंदर्भात पंतप्रधानांपासून दूरसंचार निगमच्या सर्व अधिकाऱ्यांपयर्ंत पत्रव्यवहार करून मागणी केली होती. बीएसएनलकडे ग्राहकांचे ३६४९ कोटी रुपये बिनव्याजी पडून आहेत. ग्राहकांच्या अनामत रकमेवर वीज वितरण कंपनी, प्राप्तिकर विभाग, बँका, विमा कंपनी, पोस्ट ऑफीस इत्यादी व्याज देतात. बीएसएनएल मात्र ग्राहकाची प्रचंड मोठी रक्कम बिनव्याजीच वापरत आहे.
ग्राहकांच्या मालकीच्या दूरसंचार संचावरही बीएसएनएल दरमहा १४० रुपये भाडे घेते. ज्येष्ठ नागरिकांना देशात आणि परदेशात अनेक सवलती आहेत. मात्र, बीएसएनएल त्यांना कोणत्याच सवलती देत नाही. बीएसएनएलकडून ग्राहकांची कित्येक वर्षांंपासून आíथक लूट सुरू आहे.
याविरुध्द चिलवरवार १५ वर्षांंपासून लढत आहेत. त्यांच्या या न्याय लढय़ाची दखल केंद्रीय रसायन मंत्री हंसराज अहीर यांनी घेतली असून, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्र लिहून हीच मागणी केली आहे. ग्राहकांना व्याजापोटी देय असलेली रक्कम त्यांच्या दूरध्वनी देयकातून वजा करण्यात यावी शिवाय, दूरध्वनी संचावर आकारण्यात येणारे दरमहा भाडे रद्द करावे, अशीही मागणी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी
केली आहे.