बीड लोकसभा मतदारसंघातील आंधळेवाडी (तालुका आष्टी) येथे उद्या (गुरुवारी) फेरमतदान घेण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर कॅमेऱ्याची करडी नजर राहणार आहे, तर मतदारांच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गावाच्या चारही बाजूंच्या रस्त्यांवर नाकाबंदी व शंभर पोलिसांचा ताफा तैनात केला आहे. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी दिवसभर तळ ठोकून राहणार आहेत.
आंधळेवाडी येथील मतदान केंद्र क्रमांक २१३ वर गेल्या १७ एप्रिलला भाजप समर्थक कार्यकर्त्यांनी मतदान केंद्र ताब्यात घेऊन मतदान केले होते. प्रत्यक्ष मताऐवजी आठ मते मतदान यंत्रात जास्तीची नोंदवली गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर केंद्रप्रमुखाच्या तक्रारीवरून दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. राज्यात मतदान केंद्र ताब्यात घेतल्याचा एकमेव गुन्हा येथे दाखल झाल्याने खळबळ उडाली. जिल्हा निवडणूक अधिकारी नवलकिशोर राम यांच्या शिफारशीनंतर निवडणूक आयोगाने २४ एप्रिलला फेरमतदान घेण्याचे आदेश बजावले. प्रशासनाने फेरमतदानाची तयारी पूर्ण केली असून शंभर पोलीस कर्मचारी, १० पोलीस अधिकारी, तीन बूथ अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक आणि व्हिडिओ कॅमेरामन अशी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मतदारांच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावली जाणार आहे. गावात ३९२ मतदार आहेत.
ग्रामस्थांनी शांततेत मतदान करावे, या साठी औरंगाबाद विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अमितेश कुमार यांनी मंगळवारी गावात जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधला व कोणत्याही दडपणाशिवाय, निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी राम, पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उद्या दिवसभर गावात थांबणार आहेत. कोणतीही गडबड होऊ नये, या साठी गावाच्या चारही बाजूच्या रस्त्यांवर पोलिसांची नाकाबंदी राहणार आहे.
६ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी
आंधळेवाडी येथील मतदान केंद्र बळकावल्याप्रकरणी अटक केलेल्या भाजपसमर्थक १६ कार्यकर्त्यांना बुधवारी आष्टी तालुका न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने या सर्वाना ६ मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. न्यायालयीन कोठडी दिल्यामुळे जामीन मिळेल, अशी अपेक्षा असली तरी प्रत्यक्षात पोलिसांनी फेरमतदान असल्यामुळे आणि या प्रकरणातील इतर संशयित अटक नसल्यामुळे पुन्हा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, असे न्यायालयाला सांगितले.

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
Inconvenient as Sinnar buses go directly from the flyover without stopping at small villages
नाशिक: लहान गावांच्या थांब्यांना बससेवेची हुलकावणी
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा