अवधान शिवारातील शेतजमीन विक्री करण्याच्या नावाखाली नाशिकसह धुळ्यातील सात संशयितांनी व्यापाऱ्यास तब्बल ५० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय काशिनाथ अग्रवाल (रा. रामवाडी, मालेगावरोड, धुळे) यांनी याबाबत तक्रार दिली. खोटे व बनावट दस्तावेज तयार करून अवधान येथील शेती गट क्रमांक ७३/१ एकूण क्षेत्र ९१ आर ही जमीन विकण्याचा बनाव निर्माण करून २६ मे २०१३ पासून संशयितांनी वेळोवेळी ५० लाख ५१ हजार रुपये लुबाडले, मात्र शेती नावावर न करता फसवणूक केली. या तक्रारीवरून पोलिसांनी पद्मा अग्रवाल, राजेंद्र अग्रवाल, क्षितिज अग्रवाल, भारती बापट, माधव बापट (सर्व रा. धुळे) तसेच अजीज श्रीविजय गोखले, नंदकिशोर अवधूत आधारकर (रा. नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.