महाड पोलादपूर माणगाव तालुक्यांतील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजा तर्फे  दि. २० जानेवारी २०१३ रोजी येथील  चांदे क्रीडांगणावर उभारण्यात आलेल्या स्वर्गीय दलितमित्र सुरबानाना टिपणीस नगरीमध्ये आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महाड चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचे अध्यक्ष राजेंद्र टिपणीस यांनी दिली. महाड येथील सुरुची गार्डनच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मेळाव्याचा उद्देश व कार्यक्रमाची सविस्तर माहिती सांगितली. यावेळी रघुवीर देशमुख, चंद्रकांत अधिकारी हे सीकेपी समाजाचे जेष्ठ सदस्य उपस्थित होते. टिपणीस म्हणाले, दर दोन वर्षांने मेळाव्याचे आयोजन केले जाते. आतापर्यंत उरण, अलिबाग, रोहा, पेण या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या वर्षी महाड शहरात घेण्यात येणार आहे. सन १९६९ मध्ये स्वर्गीय सुरबानाना टिपणीस यांनी महाडमध्ये अखिल भारतीय ज्ञाती समाज मेळावा आयोजित केला होता त्यानंतर या वर्षी मेळावा होत आहे. ते पुढे म्हणाले, महाड ही शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचे महाराजांच्या स्वराज्य संस्थापनेमध्ये मोठे योगदान असल्याने या पवित्र भूमींमध्ये ज्ञाती बांधवांचा मेळावा घेण्याचे निश्चित करण्यात आले. स्वामिनिष्ठा इमान शौर्य कसोटीस उतरलेला हा समाज भारतीय लोकशाहीचा मोठा वैचारिक आधार ठरला आहे.      या मेळाव्याचे उद्घाटन प्रसिद्ध वास्तुविशारद जयंतराव टिपणीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मेळाव्यानिमित्त प्रकाशित करण्यात येणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. शरद चिटणीस यांच्या हस्ते होणार असल्याचे टिपणीस यांनी सांगितले. त्याच प्रमाणे राज्य शासनाच्या सा. बां. विभागाचे स्वीय सहाय्यक महेश दुर्वे, कॅप्टन शिवाजी महाडकर, केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी श्रीमती उज्ज्वलाताई शिंदे (वैद्य), मराठी कलावंत पुष्कर श्रोत्री, तुशार दळवी, अवदूत गुप्ते, भुषण प्रधान, मंगेश कुलकर्णी, हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे आदी मान्यवरांसह सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक ज्ञाती बांधव उपस्थित राहाणार आहेत. मेळाव्याच्या मुख्य प्रवेशव्दाराला शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती टिपणीस यांनी दिली. मेळाव्या संबंधी अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी सुधाकर वैद्य. ठाणे,(९३२३००९११०). संजीवनी प्रकाश टिपणीस. (९८२०९००८४२), नंदकुमार सुळे, पुणे. (९८५०६६५५९८), अभय देशपांडे. (९०११३८८७९५) अनुपा अतुल देशपांडे सी. के. पी. हॉल विलेपार्ले (२३८३७२७४), समीर देशमुख महाड (८८८८३७३५६८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाड सीकेपी समाजाचे अध्यक्ष राजेंद्र टिपणीस यांनी केले आहे.