काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीमध्ये १५ वर्षे सत्तेत एकत्र राहिल्यानंतर भांडणे झाली. पण सेना-भाजपमध्ये सत्तेत येऊन १५ दिवस झाल्यानंतरच भांडणे सुरू झाली असून राज्यासाठी हे चांगले लक्षण नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आ. छगन भुजबळ यांनी युतीमध्ये सुरू असलेल्या वाक् युध्दावरून बोचरी टीका केली. नदी जोड प्रकल्पांच्या पाणी वाटपात गुजरातला झुकते माप दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला.
 गुजरातचे सरकार पाणी मिळविण्यासाठी धडपड करू शकते तर महाराष्ट्र सरकार का कमी पडत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या मुद्यावर राज्यातील सर्वपक्षीयांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.