Latur Water Problem लातूरकर पाणी समस्येने त्रस्त आहेत. पाण्याच्या वितरणाची व्यवस्था सुधारणे व कायमस्वरूपी पाण्याच्या स्रोतापासून शहराला पाणी उपलब्ध करणे हे येत्या तीन वर्षांत केले जाईल व लातूरची पाणी समस्या हा कायमस्वरूपी भूतकाळ बनेल या पद्धतीने काम करेन, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांनी लातूरकरांना आश्वासित केले.

महानगरपालिकेच्या प्रचाराच्या सांगता सभेत सोमवारी ते बोलत होते. व्यासपीठावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहानवाज हुसेन, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार सुधाकर भालेराव, विनायक पाटील, अनिल सोले, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, जिल्हा परिषद अध्यक्ष मििलद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके आदी उपस्थित होते.

Mahayutis Srirang Barne Show of Power An 80-year-old lady Shiv Sainik also participated in rally
महायुतीच्या श्रीरंग बारणेंचं शक्ती प्रदर्शन; ८० वर्षाच्या कट्टर शिवसैनिक आजीही रॅलीत सहभागी
Devendra Fadnavis, Asserts Victory, Victory of mahayuti, mahayuti Victory India's Progress, Yavatmal Washim Campaign, Yavatmal Washim lok sabha seat, lok sabha 2024, election 2024,
“देशाच्या प्रगतीसाठी महायुतीचा विजय हाच योग्य पर्याय,” राळेगाव येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा
Nominate BJP for Dharashiv Delegation demands to Devendra Fadnavis
धाराशिवसाठी भाजपालाच उमेदवारी द्या! शिष्टमंडळाची फडणवीस यांच्याकडे मागणी

मुख्यमंत्री म्हणाले, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ज्या टाऊन हॉल मदानावर सभा झाली व त्यानंतर जिल्हा परिषदेत पूर्ण बहुमत मिळाले आता त्याच मदानावर महानगरपालिका प्रचाराची सांगता होत आहे व लातूरकर पुणे, नाशिक, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, िपपरी-चिंचवड या नागरिकांपेक्षाही हुशार असल्यामुळे ते आपल्या विकासासाठी भाजपाला सत्ता देतील, याची खात्री आहे. लातूरचा शिक्षणातील पॅटर्न राज्यभर प्रसिद्ध आहे. आता येथील विकासाचा पॅटर्न राज्याला दिशादर्शक असेल. स्वातंत्र्यानंतर शहरातील लोकसंख्या २० टक्के तर ग्रामीण भागातील लोकसंख्या ८० टक्के होती. २०११ च्या जनगणनेनंतर राज्यातील ३०० शहरांत ५० टक्के लोक तर उर्वरित ५० टक्के लोक २९ हजार गावात राहतात हे समोर आले. अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या शोधार्थ ग्रामीण भागातील लोक शहरात दाखल झाले मात्र नियोजन नसल्यामुळे गावे ओस पडली अन् शहरे बकाल झाली. पाणी, कचरा, सांडपाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते, अशा कोणत्याच बाबतीत योग्य नियोजन न केल्यामुळे शहरवासीय त्रस्त झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरीकरण ही संधी समजून नियोजन करा असे आम्हाला आदेशित केले आहे. शहरातील कचरा ही डोकेदुखी नसून ती संपत्ती आहे. आज अनेक शहरात खतांचा ब्रँड करून विकला जातो. पॅलेट निर्मिती करून पर्यावरणपूरक कोळशाची विक्री होते. विद्युतनिर्मिती केली जाते. लातूर शहरातील कचऱ्याचा प्रस्ताव पाठवल्यानंतर त्यावर तातडीने निर्णय घेऊन निधी दिला जाईल. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी उद्योगाला वापरले जाईल. अडचणीत सापडलेल्या लातूरवासीयांना गतवर्षी दररोज २५ लाख लिटर पाणी देण्याचे कर्तव्य पार पाडले याचे एकीकडे समाधान आहे तर दुसरीकडे इतके दिवस सत्ता असणाऱ्या मंडळींनी साधी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नाही याची खंतही आहे. अमृत योजनेंतर्गत लातूर शहरातील पाणी वितरण व्यवस्थेसाठी ४० कोटी रुपये दिले आहेत. आणखी जितके कमी पडतील तेवढे पसे दिले जातील. शहराला कधीही पाणी कमी पडणार नाही अशा ठिकाणावरून पाणी उपलब्ध केले जाईल. त्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. तेवढी कळ काढा व त्यानंतर पाणी समस्या ही लातूरसाठी कायमस्वरूपी भूतकाळ असेल हे मी पाहीन, असे मुख्यमंत्री म्हणाले.

शहरातील बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी संभाजी पाटील निलंगेकर यांनी टाटा मोटर्सबरोबर करार केला असून २ हजार ५०० तरुणांना यातून रोजगार मिळणार आहे. १० हजार लोकांना रोजगार मिळण्यासाठी सरकार पाठीशी असेल. शिक्षण, आरोग्य यासंबंधी सरकारने सुरू केलेल्या योजनांची माहितीही त्यांनी दिली.

प्रारंभी शहनवाज हुसेन यांनी लातूरवासीयांनी भाजपाच्या मागे उत्तर प्रदेशच्या जनतेसारखे उभे राहण्याचे आवाहन केले. संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूरमध्ये जगणे अडचणीचे जात असल्यामुळे यापूर्वी अनेक वर्षांपासून लोक स्थलांतर करत आहेत. मनपाची सत्ता हाती आल्यास लोकांना स्थलांतर करावे लागणार नाही या पद्धतीचा कारभार करण्याचे आश्वासन दिले. प्रास्ताविक शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी केले. सभेचे सूत्रसंचालन शैलेश गोजमगुंडे यांनी केले.

लातूरच्या नेत्याला जनतेशी देणेघेणे नाही

लातूरचे सध्याचे नेते जुन्या पुण्याईवर मते मागत आहेत. तुमच्या पूर्वजांनी केले त्या पुण्यावर किती दिवस जगणार, असा प्रश्न उपस्थित करून या नेत्याला जनतेशी काहीही देणेघेणे नाही. तेव्हा शहरवासीयांच्या भवितव्यासाठी भाजपाला साथ द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. आमदार अमित देशमुख यांचे नाव घेणे त्यांनी टाळले.