जिल्हा काँग्रेसचा माजी सरचिटणीस व माजी नगरसेवक
‘दादा’ अशी ओळख असलेल्या, खुनाच्या गंभीर आरोपातून नुकत्याच निर्दोष सुटलेल्या आणि आजही काही गुन्हे दाखल असलेल्या येथील प्रवीण दिवटे (४१) या तरुणाची अज्ञात इसमांनी शनिवारी सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास शिवाजी हायस्कूलजवळील त्याच्या घरासमोरच डोळ्यात मिरची पूड फेकून व बंदुकीच्या पाच गोळ्या झाडून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रवीणवर आरोपींने सत्तूरने सपासप वार केले व ते पसार झाले. या घटनेची वार्ता विदर्भभर पसरली. परिसरातील शाळा, दुकाने व बाजारपेठा पटापट बंद झाल्या. साऱ्या शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. विशेष पोलीस कुमक बोलवून शहरात तगडा बंदोबस्त पोलिसांनी ठेवला आहे.
प्रवीण हा जिल्हा काँग्रेस समितीचा माजी सरचिटणीस होता व काँग्रसेच्या उमेदवारीवर तो नगरसेवकही झाला होता. त्याची पत्नी उषा दिवटे ही देखील पोटनिवडणुकीत निवडून येऊन नगरसेविका झाली होती. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली व मोठा आप्तपरिवार आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी आठ वाजताचे दरम्यान प्रवीण दिवटेच्या वाहनचालकाने चार चाकी वाहनाचे चाक दुरुस्त करण्यासाठी वाहनाची किल्ली मागितली. प्रवीणने किल्ली दिली. नंतर तो आपल्या कार्यालयात बसलेला असतांना कोणी तरी बाहेरून त्याला आवाज दिला. कार्यालयाचा दरवाजा उघडून जसा प्रवीण बाहेर आला त्याच वेळी बाहेर उभ्या असलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्या डोळ्याात मिरची पूड फेकली व त्याच्यावर बंदुकीने गोळ्या झाडल्या. इतकेच नव्हे तर सत्तूरने त्याची छाती, मान, डोके, हाते व बगलेतवर १५-२० गंभीर घाव घातले. मारेकऱ्यांनी झाडलेल्या गोळ्यांपकी एक छातीत, तर दुसरी हाताला चाटून गेली. यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले. त्याच वेळी गंभीर अवस्थेतील प्रवीणला त्याच्या मुलींनी तत्काळ वसंतराव नाईक शासकीय इस्पितळात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शासकीय इस्पितळात यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. या प्रकरणात सृष्टी दिवटे हिच्या तक्रारीवरून अज्ञात मारेकऱ्यांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिसांनी या प्रकरणात चार संशयितांना ताब्यात घेतल्याचे कळते.
उल्लेखनीय म्हणजे, गुंठय़ा राऊत हत्या प्रकरणात प्रवीणला न्यायालयाने पाच-सहा दिवसांपूर्वीच निर्दोष सोडल्यामुळे तो तुरुंगातून सुटून आला होता. वृत्त लिहिस्तोवर मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील स्टेट बँक चौक ते वाघापूर नाका रस्ता, तसेच उत्तरीय तपासणी सुरू असल्याने वाघापूर नाका ते शवविच्छेदनगृहाचा रस्ताही तात्पुरता बंद केला होता. शहरात पोलिसांचा दगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रवीणच्या घराजवळ नातेवाईक व मित्र परिवारांची मोठी गर्दी जमलेली होती.

कायदा व सुव्यवस्था ढासळली
शहरात कायदा व सुव्यवस्था पार ढासळली असून चोऱ्या व घरफोडय़ांची मालिका सुरू असताना अलीकडेच खुनाच्याही दोन-तीन घटना घडलेल्या असतानाच प्रणीण दिवटेच्या खुनाच्या घटनेने कळस चढवल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. चोरांना व गुंडांना पोलिसांचे अजिबात भय वाटत नसल्याने सामान्यजन मात्र जीव मुठीत घेऊनच वावरत असल्याचे बोलले जाते.

chandrapur, Tension Erupts Teli Samaj prograame, Teli Samaj Felicitation progrrame, Congress Leaders Declare Support, Controversy Ensues, pratibha dhanorkar, chandrapur news, lok sabha 2024,
चंद्रपूर : निमंत्रण सत्कार सोहळ्याचे, पाठिंबा काँग्रेसला….वास्तव कळताच धक्काबुक्की….
Leader of Gadhinglaj Appi Patil join Congress with thousands of activists
गडहिंग्लजचे नेते अप्पी पाटील काँग्रेसमध्ये; हजारो कार्यकर्त्यांसह केला प्रवेश
Former Congress MLA Namdev Usendi resigned alleging that money was the criterion for ticket distribution in Congress
काँग्रेसमध्ये तिकीट वाटपासाठी पैशांचा निकष, गंभीर आरोप करून काँग्रेसचे माजी आमदार उसेंडी यांचा राजीनामा
Dr Nitin Kodawte and Dr Chanda Kodawte of Congress join BJP before Lok Sabha elections
गडचिरोली : ‘वडेट्टीवार’ समर्थक नेत्यांचा भाजप प्रवेशाने काँग्रेमध्ये खळबळ