औरंगाबाद महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शनिवारी नवीन प्रभाग रचनेची आरक्षण निश्चिती करण्यात आली. यामध्ये अनेक दिग्गजांचे प्रभाग आरक्षित झाले आहेत, तर इतर अनेकांचे जीव भांडय़ात पडले आहेत.
महापालिकेत निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या ११३ आहे. सोडतीत जाहीर झालेले आरक्षण पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण २९, सर्वसाधारण महिला ३०, नागरिकांचा मागास प्रवर्ग १५, अनुसूचित जाती ११, अनुसूचित जमाती १, अनुसूचित जाती (महिला) ११ व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला १६.
सर्वसाधारण प्रभाग : एकतानगर, वानखेडेनगर, मयूर पार्क, सुरेवाडी, रोजेबाग भारतमातानगर, मिटमिटा, जयभीमनगर (घाटी परिसर), गणेश कॉलनी, पवननगर, गणेशनगर, रहेमानिया कॉलनी, शरीफ कॉलनी, नबाबपुरा, न्यायपुरा, गुलमंडी, नागेश्वरवाडी, गांधीनगर (बापूनगर), भवानीनगर, इंदिरानगर (उत्तर) बायजीपुरा, गुलमोहर कॉलनी (सत्यमनगर), पदमपुरा, बौद्धनगर (उत्तमनगर), विद्यानगर, न्यायनगर, अंबिकानगर (मुकुंदवाडी), कामगार कॉलनी, कबीरनगर, राहुलनगर (तादातनगर), शिवाजीनगर.
सर्वसाधारण महिला : मयूरनगर (सुदर्शननगर), लोटा कारंजा, चेलिपुरा, शहाबाजार, नेहरूनगर, आंबेडकरनगर, चौधरी कॉलनी (चिकलठाणा), किराडपुरा, कैसर कॉलनी, राजाबाजार, संजयनगर, संजयनगर जिन्सी, बारी कॉलनी, सुराणानगर, समतानगर, विष्णुनगर, जवाहर कॉलनी, एन३ एन४ सिडको पारिजातनगर, ठाकरेनगर एन २ सिडको, जयभवानीनगर सिडको तेरावी योजना, पुंडलिकनगर, विजयनगर (बाळकृष्णनगर), जयविश्वभारती कॉलनी, दशमेशनगर (ज्योतीनगर), एकनाथनगर (म्हाडा कॉलनी), कांचनवाडी (नक्षत्रवाडी), हमालवाडा रेल्वेस्टेशन, देवानगरी, मयूरबन कॉलनी व प्रियदर्शनी इंदिरानगर.
नागरिकांचा मागास प्रवर्ग : हर्सूल, विश्वासनगर (हर्षनगर), जयसिंगपुरा, आरेफ कॉलनी (प्रगती कॉलनी), शताब्दीनगर, नारेगाव, इंदिरानगर (दक्षिण) बायजीपुरा, अल्तमश कॉलनी, आविष्कार कॉलनी, रामनगर, विश्रांतीनगर, गजानननगर, उल्कानगरी, वेदांतनगर, विटखेडा.
अनुसूचित जाती : भगतसिंगनगर (म्हसोबानगर), पहाडसिंगपुरा (बेगमपुरा), पडेगाव, एमआयडीसी चिकलठाणा, भडकलगेट, खडकेश्वर, समर्थनगर, शिवशंकर कॉलनी (बालाजीनगर), विठ्ठलनगर, बन्सीलालनगर, भारतनगर (शिवाजीनगर भाग). अनुसूचित जमाती – वेदांतनगर (राजनगर).
अनुसूचित जाती (महिला) : यादवनगर एन ११, नंदनवन कॉलनी (शांतिपुरा), शिवनेरी कॉलनी, स्वामी विवेकानंदनगर, अयोध्यानगर, औरंगपुरा, अजबनगर, कोकणवाडी, चिकलठाणा, राजनगर-मुकुंदनगर, रामकृष्णनगर (काबरानगर).
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : भीमनगर (उत्तर), भावसिंगपुरा (भीमनगर, दक्षिण), बुढीलाइन (कबाडीपुरा), श्रीकृष्णनगर, मिसरवाडी, आरतीनगर (मिसरवाडी), नारेगाव (बिजवाडी), रोशनगेट, कोतवालपुरा (गरमपाणी), एन ६ सिडको, कोकणवाडी (कोठला कॉलनी), क्रांती चौक, रमानगर, मुकुंदवाडी, संजयनगर (मुकुंदवाडी) व गारखेडा (मेहेरनगर).