वेंगुर्ले उभादांडा गावसकरवाडी येथील रहिवासी लेदरबॉल क्रिकेटचे ज्येष्ठ प्रशिक्षक द्वारकानाथ ऊर्फ बबन केशव गावसकर (८६) यांचे ४ मे रोजी निधन झाले.

वेंगुर्ले येथील बॅ. खर्डेकर महाविद्यालयातील विद्यार्थी व तरुण खेळाडूंना त्यांनी लेदरबॉल क्रिकेट खेळाचे मोफत प्रशिक्षण दिले होते. त्यांच्या या कार्याबद्दल क्रीडाप्रेमींनी त्यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा केला होता. या वेळी बी.सी.सी.आय.चे तत्कालीन संचालक अजय शिर्के वेंगुर्ले येथे उपस्थित होते.

Former England star spinner Derek Underwood passes away
इंग्लंडचे फिरकी गोलंदाज डेरेक अंडरवूड यांचे निधन
Tom Latham believes that Test cricket is the most important sport news
कसोटी क्रिकेटच सर्वांत महत्त्वाचे टॉम लॅथम
Ruturaj Gaikwad has been fantastic as CSK captain so far says Hussey
IPL 2024 : गावस्कर यांच्यापाठोपाठ आता चेन्नईचे प्रशिक्षक हसीदेखील प्रभावित; ऋतुराज गायकवाड क्रिकेट जाणणारा माणूस
nagpur ipl betting marathi news, mahadev app ipl betting marathi news
कोट्यवधींची उलाढाल! ‘आयपीएल’वर सट्टा अन् बनावट महादेव ॲप…

क्रिकेटमधील विक्रमवीर क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचे ते सख्ये काका होय. आंतरराष्ट्रीय खेळाडू व कसोटीपटू एकनाथ सोलकर, पद्माकर शिवलकर, पांडुरंग साळगांवकर यांना त्यांनी मार्गदर्शन केले होते. त्यांच्या सोबत ते क्रिकेटही खेळले होते. रणजीपटू मिलिंद रेगे यांचेही ते गुरू होते.

वेंगुर्ले येथे त्यांना श्रद्धांजली वाहताना माजी क्रिकेटपटू पांडुरंग साळगावकर, अ‍ॅड्. बापू गव्हाणकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले हे बबन गावसकर यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गसह मुंबईत अनेक खेळाडूंना घडविले. त्यांचा नम्र स्वभाव व डावखुरी फलंदाजी या जमेच्या बाजू होत्या. क्रिकेटमधील एक जाणता मार्गदर्शक हरपला असे म्हणाले.