डहाणू नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक जितेंद्र यशवंत केदारे यांना एका ठेकेदाराकडून ४० हजारांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी एका हॉटेलात रंगेहाथ पकडल्यामुळे डहाणूत खळबळ उडाली आहे.
डहाणू नगरपालिकेत आरोग्य निरीक्षक म्हणून काम करीत असलेल्या जितेंद्र यशवंत केदारे यानी डहाणूतीलच एक ठेकेदार विश्वास निकम यांच्याकडून बिल काढण्यासाठी ४० हजारांची मागणी केली होती. त्यामुळे विश्वास निकम यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
या तक्रारीनुसार आज संध्याकाळी डहाणू येथील अंगेठी हॉटेलमध्ये विश्वास निकम यांच्याकडून ४० हजारांची लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डी.वाय.एस.पी. हरीष खेडकर, पोलिस निरीक्षक अरुणकुमार सकपाळ, ए.एस.आय. रोहे यांनी रचलेल्या सापळ्यात सापडला. विश्वास निकम हा डहाणू शहर शिवसेना शाखेचा प्रमुख आहे.