पेण अर्बन बँकेतील १० हजार रुपयांपर्यंत ठेवी असणाऱ्या ठेवीदारांना त्यांचे पसे परत देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार गुरुवारपासून या ठेवींचे वितरण सुरू केले जाणार आहे. त्यामुळे दहा हजार रुपयांच्या आतील ठेवी असणाऱ्या सर्व ठेवीदारांनी आपल्या शाखेत संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासक मंडळाने केले आहे.
पेण अर्बन बँकेच्या ठेवीदार संघर्ष समितीतर्फे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान बँकेकडे सध्या जमा असणाऱ्या ५५ कोटींच्या ठेवींप  १० हजार रुपये अथवा व त्यापेक्षा कमी ठेवी असलेल्या बँकेच्या ठेवीदारांना रक्कम वाटप करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशाची अंमलबजावणी चार आठवडय़ांत करायची असल्याने सर्व ठेवीदार आणि खातेदार यांनी त्यांच्या जवळच्या शाखेत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खातेदारांच्या शंका व समस्या यांचे निरसन करण्याकरिता बँकेने संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.  न्यायालयाच्या निर्देशानुसार उद्यापासून बँकेच्या १ लाख ३७ हजार ठेवीदारांना त्यांचे पसे करण्यास सुरुवात होणार आहे. बँकेच्या ठेवीदारांनी आपले पसे परत मिळवण्याकरिता ठेव पावती, पासबुक बँकेत सादर करावेत. त्याचबरोबर आपले वैध ओळखपत्राच्या छायांकित प्रती सादर कराव्यात. या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतरच निधी वितरणांची कार्यवाही सुरू केली जाणार आहे.  बँकेच्या १ लाख ९७ हजार ठेवीदारांपकी जवळपास सव्वा लाख ठेवीदारांना उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे दिलासा मिळणार आहे. १० हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी असणाऱ्यांना स्वत:चे पसे आता परत मिळणार आहेत. ही ठेवीदारांच्या दृष्टीने नक्कीच समाधानाची बाब आहे. मात्र उर्वरित ६५ हजार ठेवीदारांच्या लाखो रुपयांच्या ठेवी कधी मिळणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. दरम्यान शंका समाधानासाठी बँकेतील ठेवीदारांनी पुढील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासक मंडळाने केले आहे. अनिता मेश्राम, आरती सत्त्वे मुख्य कार्यालय- पेण, शाखा कार्यक्षेत्र-पेण, रामवाडी, चिंचपाडा, वडखळ, पोयनाड संपर्क क्रमांक ०२१४३/२५३३१५, श्रेया साटम- शाखा कार्यक्षेत्र- गिरगांव, दादर, विलेपाल्रे, उरण. संपर्क क्रमांक- ०२२/२४२२९, २४३६२५०७, स्नेहा साळुंखे, भाग्यश्री नाईक-शाखाकार्यक्षेत्र- कर्जत, नेरळ, माथेरान, संपर्क क्रमांक- ०२१४८-२२२२०३, २३८९१८,  पूजा जोगळेकर, अक्षया लाड- शाखा कार्यक्षेत्र- खोपोली, शिळफाटा, वावोशी, मोहोपाडा. संपर्क क्रमांक- ०२१९२-२६६२९४, २६३४४४,  सोमनाथ अहिरे- शाखा कार्यक्षेत्र- रोहा, पाली, कोलाड. संपर्क क्रमांक ०२१९४/२३३९९१.