स्वातंत्र्यपूर्वकाळात देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढणाऱ्या देशभक्तांची गरज होती. स्वातंत्र्यानंतर अनेक प्रश्न आहेत. पाणीटंचाईच्या समस्येतून अनेक गावांना बाहेर काढण्यासाठी जलस्वातंत्र्याची लढाई लढणाऱ्या सनिकांची मोठी गरज असून हलगरा येथील ग्रामस्थ ही लढाई यशस्वीपणे लढत आहेत. त्यांना माझा मानाचा मुजरा असून अशा देशभक्तांचीच आज खरी गरज असल्याचे प्रतिपादन, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंगा तालुक्यातील हलगरा गावात श्रमदानानंतर शेतकरी संवाद कार्यक्रमात केले.

आज (गुरुवारी) सकाळी पावणेआठ वाजता हलगरा येथील पांडुरंग वतने वकील या शेतकऱ्याच्या शेतात मुख्यमंत्र्यांनी कंपार्टमेंट बंडगचे काम सुमारे अर्धा तास प्रत्यक्ष केले. त्यांच्यासमवेत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार सुनील गायकवाड आदी उपस्थित होते.

Freedom of press, right to dignity,
वृत्तपत्र स्वातंत्र्याचा वापर प्रतिष्ठेच्या अधिकाराचे उल्लंघन करण्यासाठी नको – उच्च न्यायालय
sindhudurg district collector ordered deepak kesarkar s to deposit pistols
केसरकरांना पिस्तूल जमा करण्याचे आदेश, सावंतवाडीतील २५० परवानाधारकांपैकी केवळ १३ जणांना नोटीसा
citizenship question in the constituent assembly constituent assembly debate on
चतु:सूत्र : नागरिकतेचा पैस
Delhi aap
आप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, भाजपाही केजरीवालांच्या राजीनाम्यावर ठाम; दिल्लीत सत्ताधारी-विरोधकांची निदर्शने!

या गावातील युवक, महिला गेल्या ५० दिवसांपासून जलसंवर्धनाच्या कामासाठी दररोज श्रमदान करत आहेत. गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गावातील सुमारे एक हजार तरुण, तरुणी कामात सहभागी झाले होते. श्रमदानानंतर एका आंब्याच्या झाडाखाली मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

फडणवीस म्हणाले, एखाद्या चित्रपटात गावाचे परिवर्तन झाल्याचा प्रसंग दोन, तीन मिनिटात दाखवला जातो. मात्र, प्रत्यक्ष परिवर्तन करणारे गावातील हिरो मला पहायला मिळाले हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. देशभक्ती हा रोज जगण्याचा विचार आहे. आपल्या वागण्यातून इतरांच्या जीवनात परिवर्तन घडवता येण्याचा आनंद काही वेगळाच आहे. छत्रपती शिवरायांनी अनेक किल्ले वसवले. त्यात पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सध्याचा दुष्काळ हा मानवनिर्मित असून नियोजनातून त्यावर मात करता येते. आपल्या गावातील पाणी हे आपल्या मालकीचे आहे याची जाणीव निर्माण करून आपले गाव पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी व्हायला हवे, यासाठी प्रत्येकाने स्वतचे योगदान दिले पाहिजे, ही जागृती महत्त्वाची आहे. हलगऱ्यासारख्या गावात ही जागृती झाली म्हणूनच सुमारे ८० कोटी लिटर पाणी साठवण्याचे मोठे काम झाले. पाणी फाउंडेशन, आर्ट ऑफ लिव्हींग, नाम फाउंडेशन अशा विविध संघटनांच्या पुढाकाराने गावोगावी पाणी वाचवण्याचे व पाणी उपलब्ध करण्याचे काम सुरू आहे. हलगरा गावात शिवजयंती व आंबेडकर जयंतीवरील खर्च टाळून लोकांनी श्रमदान करून बंधारे बांधले हा राज्यातील सर्व गावांसाठी एक वेगळा संदेश असल्याचे ते म्हणाले.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेत राज्यातील ४० हजार तलावातील गाळ काढण्याची योजना आहे. गटशेती अंतर्गत शंभर एकर जमीन व २० शेतकरी एकत्र आले तर या गटाला ५० लाख रुपयांच्या शासकीय योजनांचा लाभ दिला जाईल. हलगरा गावात होत असलेले काम लक्षात घेऊन आगामी काळासाठी हे गाव आपण दत्तक घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. पाणी उपलब्ध झाले म्हणून उसाच्या मागे न लागता पीक पध्दतीत बदल करा. गाईचे दूध जसे प्रेमाने काढले पाहिजे त्याच पध्दतीने शेतीतून उत्पादन घेतले पाहिजे. ओरबाडून घेतले तर अनर्थ होतो हे लक्षात घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रारंभी गावातील व्यंकट सगरे यांनी २८ वर्षांपासून गावात श्रमदानाची परंपरा आहे व त्याचाच परिपाक म्हणून जलयुक्तची कामे लोकसहभागातून घेण्यात आल्याचे सांगितले. योगेश गायकवाड या तरुणाने गेल्या वर्षभरापासून गावात सुमारे १८ किलोमीटर अंतराचे नाला सरळीकरणाचे काम झाले, ८१ कोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता तयार झाली. यावर्षी २४ तासात एक बंधारा संपूर्ण बांधण्याचे काम झाले. त्यात गावकऱ्यांनी मोठी साथ दिली याची माहिती सांगितली.

पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पाणी वाचवण्याच्या चळवळीत आता गावकरी मोठय़ा संख्येने उतरत असून गावांचे चित्र बदलत असल्याचे सांगितले. कार्यक्रमानंतर सर्वासोबत मुख्यमंत्र्यांनी त्याच ठिकाणी खिचडीची न्याहरी गावकऱ्यांसोबत घेतली.