धुळे शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील वासवा टायर्स जवळील एका गोडाऊनवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत ४ लाख ८६ हजार रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावरील वासवा टायर्स जवळील गोडाऊनमध्ये राज्यात प्रतिबंधित असलेला रजनीगंधा पान मसाल्याचा साठा असल्याची गुप्त वार्ता पोलीस अधीक्षक चैतन्या एस यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने गोडाऊनवर छापा टाकून १८ बॉक्स जप्त केले. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख ८६ हजार रुपयांचा साठा पोलिसांनी जप्त केला. पुढील तपासासाठी हा मुद्देमाल अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सोपवण्यात आला आहे.