आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज

लोहा, कंधार व भोकर या तीन तालुक्यांमधील ४० गावे पूरप्रवण क्षेत्रातील गावे म्हणून जिल्हा प्रशासनाने घोषित केली आहेत. नांदेड शहरातील ६० वस्त्यांचाही पूरप्रवण क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. पावसाळ्यात या गावांना, तसेच शहरातील वस्त्यांना पुराचा फटका बसू शकतो हे लक्षात घेऊन प्रशासनाने आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

पावसाळ्यात पूररेषेत येणारी गावे, तसेच वस्त्या पुरामुळे प्रभावित होतात. अशा वेळी येथील नागरिकांना निवारा उपलब्ध करून देऊन सुरक्षितस्थळी हलविण्यासाठीही प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली आहे. भोकर तालुक्यातील धानोरा, रेणापूर, दिवशी बु, महागाव, कोळगाव बु, कोळगाव खु, लगळूद व रावणगाव, दिवशी खु, मातुळ, िपपळढव, बेद्री, पाकितांडा, नांदा कु तसेच कंधार तालुक्यातील बोरी खु, घोडज, बहाद्दरपूरा, तेलूर, कौठा, मसलगा, बाचोटी, मानसपुरी, कोटबाजार, पानशेवडी, पेठवडज, महािलगी, भुकमारी, काटकळंबा, शिराढोण, दाताळा, अंबुलगा लोहा तालुक्यातील आंडगा, गौडगाव, िलबोटी, पेनूर, भारसवाडा, कौडगाव, अंतेश्वर, येळी, कामळज ही गावे पूरप्रवण क्षेत्रातील गावे म्हणून घोषित केली आहेत

नांदेड शहराच्या शिवाजीनगर भागातील श्रावस्तीनगर, नारायणनगर, अरिवदनगर, नईआबादी, लालवाडी, पारसनगर, सादातनगर, अशोकनगर क्षेत्रिय कार्यालयांतर्गत दत्तनगर, टाऊनमार्केट, विनायकनगर, नंदिग्राम सोसायटी, रेल्वेपटरी एरिया, तानाजीनगर, मित्रनगर, बालाजीनगर आदी वसाहतींचाही पूरप्रवण क्षेत्रात समावेश आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यास येथील नागरिकांना निवारा, तसेच सुरक्षित निवारा उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली आहे. या भागातील मंगल कार्यालये तसेच शाळा-महाविद्यालये निवारा केंद्र म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. नसíगक आपत्तीच्या काळात जीवितहानी व वित्तहानी होऊ नये, या साठी प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. शोध व बचाव कार्य गतिमान पद्धतीने राबविता यावे यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्हा आपत्तीप्रवण विशेषत: पूरप्रवण व भूकंपप्रवण असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करताना सर्व शासकीय कार्यालये व स्वयंसेवी संस्था यांच्यात समन्वय ठेवण्यात आला आहे.