आमच्या आया काय बाळंत हुईत न्हायत का? असा सवाल करणाऱ्या कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यापासून भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या सर्वच पक्षांच्या प्रस्थापितांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी नातलगांना मदानात उतरविले आहे.

घराणेशाहीच्या नावाने गळे काढणाऱ्यापासून सामान्य कार्यकर्ता म्हणवून जनसेवा करण्यासाठीच आपण तहहयात असल्याचा दाखला देणारे राजकीय पक्ष याला अपवाद उरलेले नाहीत.

प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रस्थापिताविरुद्ध कायम टीकात्मक प्रचार करून टाळ्या मिळविणारे राज्यमंत्री खोत यांनी आपला मुलगा सागर खोत यांना जिल्हा परिषदेसाठी बागणी गटातून रयत विकास आघाडीच्या माध्यमातून मदानात उतरले आहे.

खासदार राजू शेट्टींनी यावर आगपाखड केली असली, तरी मशागतीच्या रानात मुलाला पेरणी करू नको असे कसे सांगता येईल, असे म्हणत मुलाच्या उमेदवारीचे समर्थन केले.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद सर्व साधारण गटासाठी खुले असल्याने ज्यांना आमदारकीची अथवा खासदारकीची संधी मिळणे दुरापास्त आहे, ज्यांना आपल्या घराण्याचा वारसा अथवा राजकीय संस्थानिक अबाधित ठेवायचे आहे, अशा प्रस्थापित नेत्यांनी आपल्या जवळच्या नातलगांना या निवडणुकीच्या माध्यमातून पुढे केले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर डोळा ठेवून अनेक मातबर मंडळी आतापासूनच तयारीत आहेत.

यामध्ये डॉ. कदम यांचे जावई महेंद्र लाड यांच्याबरोबरच खा. संजयकाका पाटील यांचे चुलते डी. के. पाटील यांचे नाव घेतले जात आहे.

भाजपाचे खासदार संजयकाका पाटील यांचे चुलते डी. के. काका पाटील हे चिंचणीतून आपले भाग्य अजमावत आहेत, तर याच पक्षाचेच जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचे चुलत बंधू आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख हे कडेगावमधून मदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव िशदे यांचे सुपुत्र वैभव िशदे यांचा राज्यमंत्री खोत यांच्या मुलाशी लढत होत आहे.

कुंडल जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे नेते आ. डॉ. पतंगराव कदम यांचे जावई मिहद्र लाड यांचा सामना क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांच्याशी होत आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांच्या स्नुषा वैशालीताई कदम, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर, राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांच्या भावकीतील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, संगीता पाटील आणि संध्या पाटील हे तीन उमेदवार या निवडणुकीत उतरले आहेत.

जत तालुक्यात भाजपाचे आमदार विलासराव जगताप यांचे चिरंजीव मनोज जगताप, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांचे चिरंजीव हर्षवर्धन देशमुख, विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव सत्यजित देशमुख, भाजपाचे आ. शिवाजीराव नाईक यांचे पुत्र सत्यजित नाईक, भाजपाचे गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर, डॉ. कदम यांचे भाचे तथा जिल्हा बँकेचे संचालक विक्रम सावंत आदी राजकीय घराण्यातील नातलग प-पाहुणे या निवडणुकीच्या निमित्ताने लोकशाहीतील वारसा पुढे चालविण्याच्या प्रयत्नात आहेत.