खडसे गटाचे महत्त्व पुन्हा सिद्ध

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ६७ पैकी ३३ जागा जिंकून भाजप पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. राष्ट्रवादीने १६, तर शिवसेनेला १४ जागा मिळाल्या. राष्ट्रवादीबरोबर आघाडी करूनही काँग्रेसचे नशीब बदलले नाही. त्यांना केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. भाजपला एकहाती सत्ता मिळविण्यासाठी केवळ एक जागा कमी पडली आहे.

मागील पंचवार्षिकच्या तुलनेत यंदा भाजपला १० जागांचा फायदा झाला असून राष्ट्रवादीला चार जागा गमवाव्या लागल्या. काँग्रेसचे संख्याबळही १० वरून चापर्यंत खाली आले. शिवसेनेने मागीलप्रमाणेच या निवडणुकीतही १४ जागा कायम राखल्या. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या विधानसभा मतदार संघातील मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व चार व बोदवड तालुक्यातील दोन्ही गटात भाजपने विजय मिळविला. त्यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांच्या लोकसभा मतदार संघात येणाऱ्या चोपडा तालुक्यात प्रथमच तीन जागांवर कमळ फुलले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यात मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपला एका जागेचा फटका बसला.

शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील पाळधी-बांभोरी गटातून विजयी झाले. शिवसेनेचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांची वहिनी रुपाली सोनवणे या आसोदा-ममुराबाद गटातून पराभूत झाल्या. तेथे राष्ट्रवादीच्या पल्लवी पाटील विजयी झाल्या. सेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील यांचे पुतणे समीर पाटील पारोळा तालुक्यातील देवगाव-तामसवाडी गटातून पराभूत झाले. राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांचे पुत्र रोहन पाटील यांनी त्यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या वहिनी ज्योती वाघ या पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा-लोहटार गटातून पराभूत झाल्या. तेथे भाजपच्या विजया पाटील यांनी बाजी मारली. माजी आमदार राजीव देशमुख यांचे बंधू अतुल देशमुख चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव-देवळी गटातून, तर माजी मंत्री संजय सावकारे यांच्या वहिनी पल्लवी सावकारे भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा-वराडसीम गटातून विजयी झाल्या.

जळगाव जिल्ह्य़ातील गटवार विजयी उमेदवार

जळगाव तालुका

शिरसोली-चिंचोली गट-धनुबाई आंबटकर (राष्ट्रवादी), नशिराबाद-भादली गट- लालचंद पवार (भाजप), कानळदा-भोकर गट- प्रभाकर सोनवणे (भाजप), म्हसावद-बोरनार गट- पवन सोनवणे (शिवसेना), ममुराबाद-आसोदा गट- पल्लवी पाटील

(राष्ट्रवादी)

चोपडा तालुका

वर्डी-गोरगावले गट- ज्योती पाटील (भाजप), अडावद-धानोरा गट- दिपाली पाटील (काँग्रेस), चौगाव-विरवाडे गट-उज्वला  माळके (भाजप), घोडगाव-लासूर गट-हरीश पाटील (शिवसेना), बुधगाव-चहार्डी गट- डॉ. निलम पाटील (राष्ट्रवादी), अकुलखेडा-चुंचाळे गट-गजेंद्र सोनवणे (भाजप)

अमळनेर तालुका

जानवे-शिरूड गट- सोनु पवार (भाजप), पातोंडा-दहिवद गट- मिनाबाई पाटील (राष्ट्रवादी), मुडी डांगरी-मांडळ गट- संगिताबाई

भिल (भाजप), कळमसरे-जळोद

गट-जयश्री पाटील (राष्ट्रवादी)

पाचोरा तालुका

बाबंरुड-कुरंगी गट-पद्मसिंग पाटील (शिवसेना), कुऱ्हा-लोहारा गट-रेखाबाई राजपूत (शिवसेना), लोहटार-खडकदेवळा गट- विजया पाटील (भाजप), पिंपळगाव-शिंदाड गट- मधुकर काटे (भाजप), नगरदेवळा-बाळद गट- मनोहर पाटील

(शिवसेना)

चाळीसगाव तालुका

बहाळ-कळमडू गट- शशिकांत साळुंके (राष्ट्रवादी), पातोंडा-वाघळी गट- पोपटराव भोळे (भाजप), मेहुणबारे-दहिवद गट-अनिल भिल्ल(भाजप),

टाकळी-करगाव गट- मंगला

जाधव (भाजप), उंबरखेड-सायगाव  गट- भूषण पाटील (राष्ट्रवादी), पिंपरखेड-रांजणगाव गट- सुनंदा

चव्हाण (राष्ट्रवादी),  देवळी-तळेगाव गट- अतुल देशमुख

(राष्ट्रवादी)

धरणगाव तालुका

पाळधी-बांभोरी गट- प्रताप पाटील (शिवसेना), पिंप्री-सोनवद गट- गोपाळ चौधरी (भाजप),

साळवा-बांभोरी गट- माधुरी अत्तरदे (भाजप)

एरंडोल गट

विखरण-रिंगणगाव गट- नाना महाजन (शिवसेना), तळई-उत्राण गट-वैशाली गायकवाड (शिवसेना), कासोदा-आडगाव गट- उज्वला पाटील(भाजपा)

भुसावळ तालुका

साकेगाव-कंडारी गट- रवींद्र पाटील (राष्ट्रवादी), हतनूर-तळवेल गट- सरला कोळी (शिवसेना), कुऱ्हा-वऱ्हाडसीम गट- पल्लवी सावकारे (भाजप)

बोदवड तालुका

नाडगाव-मनूर गट-भानुदास गुरचळ (भाजप), शेलवड-साळसिंगी गट- वर्षां पाटील (भाजप)

रावेर तालुका

पाल-केऱ्हाळा गट-नंदा पाटील (भाजप), खिरोदा-चिनावल गट- सुरेखा पाटील (काँग्रेस), वाघोदा-विवरा गट- आत्माराम कोळी (राष्ट्रवादी),  ऐनपूर-खिरवड गट- रंजना पाटील (भाजप), थोरगव्हाण-मस्कावद गट- कैलास सरोदे (भाजप), निंभोरा-तांदलवाडी गट- नंदकिशोर महाजन (भाजप)

मुक्ताईनगर तालुका

अंतुर्ली-उचंदा गट- वैशाली तायडे (भाजप), चांगदेव-रुईखेडा गट- जयपाल बोदडे (भाजप), कुऱ्हा-वढोदा गट- वनिता गवळे (भाजप), मुक्ताईनगर-निमखेडी गट- नीलेश पाटील (भाजप)

यावल तालुका

किनगाव-डांभुर्णी गट-अरुणाताई पाटील (काँग्रेस), हिंगोणे-सावखेडेसीम गट- सविता भालेराव (भाजप), न्हावी-बामणोद गट- प्रभाकर सोनवणे (काँग्रेस), साकळी-दहिगाव गट- रवंींद्र पाटील (भाजप), भालोद-पाडळसा गट- नंदा सपकाळे (भाजप)

भडगाव तालुका

वडजी-गुढे गट- कल्पना पाटील (शिवसेना), कजगाव-वाडे गट- कीर्ती चित्ते (शिवसेना), आमडदे-गिरड गट-स्नेहा गायकवाड

(राष्ट्रवादी)

पारोळा तालुका

शेवाळे-गुलाब पाटील (राष्ट्रवादी), तामसवाडी-देवगाव गट- रोहन पाटील (राष्ट्रवादी),  मंगरूळ-शिरसमणी गट- हर्षल पाटील (शिवसेना), तळवेल-बहादरपूर गट-रत्ना पाटील

(शिवसेना)

जामनेर तालुका

नेरी-पळासखेडा गट- विद्या खोडपे (भाजप), वाघारी-बेटावद गट- सुनिता पाटील (भाजप), पाळधी-लोंढरी गट- प्रमिला पाटील (राष्ट्रवादी), शहापूर-देऊळगाव गट- कल्पना पाटील (भाजप), फत्तेपूर-तोंडापूर गट- रजनी चव्हाण (भाजप), वाकोद-पहूरपेठ गट- अमित देशमुख (भाजप), शेंदुर्णी-नाचणखेडा गट- सरोजिनी गरुड (राष्ट्रवादी)