पालकमंत्री दिवाकर रावते यांचे प्रतिपादन

मराठवाडा मुक्तिसंग्रामात जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक आयुष्यभर सक्रिय राहिले. ज्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग घेऊन प्राणार्पण केले. अशा थोर स्वातंत्र्यसनिकांच्या त्यागाची जाणीव सदैव राहील. थोर हुतात्म्यांच्या बलिदानाच्या प्रेरणेमुळे मराठवाडय़ाचा विकास झाल्याचे मत पालकमंत्री दिवाकर रावते यांनी केले.

मराठवाडय़ाचा स्वातंत्र्य दिन अर्थात मुक्तिसंग्रामाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील हुतात्मा स्मृतिस्तंभ येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री रावते यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलत होते. समारंभास जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार ओम राजेिनबाळकर, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनूप शेंगुलवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, सचिन बारवकर, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा शल्य चिकित्सक एकनाथ माले आदी विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. नगर परिषद कार्यालयासमोरील हुतात्मा स्मृतिस्तंभास नगराध्यक्ष मकरंद राजेिनबाळकर यांनी पुष्पचक्र अर्पण केले. या वेळी मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांच्यासह नगरसेवक, कर्मचारी उपस्थित होते. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. आर. चोले, राष्ट्रवादी भवन येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील, भोसले हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यसैनिक भास्कर नायगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे स्वातंत्र्यसैनिक हरिश्चंद्र लामतुरे यांचा सहायक फौजदार श्रीशैल्य कट्टे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी नरहरी बडवे, विठ्ठल लामतुरे, पोलीस पाटील फातिमा मणियार उपस्थित होते. उमरगा येथील ध्वजारोहणाला उपविभागीय अधिकारी नीलेश श्रींगी, आमदार ज्ञानराज चौगुले, कैलास शिंदे, तहसीलदार अरिवद बोळंगे, तहसील कार्यालयात तहसीलदार बोळंगे, नगरपालिकेत नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश एस. बी. साळुंके, छत्रपती शिवाजी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. घनशाम जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या वेळी उपप्राचार्य बी. एन. गायकवाड, डॉ. बहिरट, पर्यवेक्षक व्ही. जी. तडोळगे उपस्थित होते.