अलिबाग-रेवस मार्गावरील चोंढी-कणकेश्वर फाटा येथे लायन्स क्लबच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या लायन्स मेडिकल अँड सर्जकिल सेंटरची सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली. या वेळी लायन्स क्लबचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
लायन्स मेडिकल अँड सर्जकिल सेंटरमध्ये मुख्यत्वे मोतीिबदूवर उपचार करण्यात येणार आहेत. या चिकित्सा केंद्रात अत्याधुनिक उपकरणांचा वापर करून मोतीिबदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मोठमोठय़ा रुग्णालयांमध्ये दिली जाणारी अत्याधुनिक सेवा या चिकित्सा केंद्रात रुग्णांना उपलब्ध होणार आहे.
आज दुपारी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी या चिकित्सा केंद्राला भेट दिली आणि त्याची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित डॉक्टरांकडून माहिती घेतली. अद्ययावत सुविधेबरोबरच तज्ज्ञ डॉक्टर या चिकित्सा केंद्रात मोतीिबदू शस्त्रक्रिया करण्यास उपलब्ध असतील. दरम्यान, या लायन्स मेडिकल अँड सर्जकिल सेंटरचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. लवकरच हे सेंटर रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे.