शहराच्या मध्यवस्तीमधील, बाजार समितीमागे असलेल्या विश्वास नर्सिग होमच्या डॉ. सुजाता नीलेश शेळके (वय ३८) यांनी रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली. यासंदर्भात कोतवाली पोलिसांनी त्यांचे पती डॉ. नीलेश विश्वास शेळके व इतर चौघांविरुद्ध डॉ. सुजाता यांचा चारित्र्याच्या संशयावरून छळ करून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडलेल्या या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेनंतर डॉ. नीलेश हा त्याच्या दोन्ही लहान मुलींना घेऊन फरार झाल्याचे व त्याच्या शोधासाठी पथके रवाना केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
डॉ. नीलेश शेळके यांच्यासह त्यांचे वडील विश्वास शेळके, आई सुनीता शेळके, शेळके यांचा मित्र अब्दुल (पूर्ण नाव नाही) व मामा अतुल औताडे (पोहेगाव, कोपरगाव) अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात सुजाता यांचे वडील प्रा. अरुण भिला पाटील यांनी फिर्याद दिली आहे. तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर पाटील यांनीच त्यांना रुग्णालयात दाखल केले. सुजाता यांना रुग्णालयात हलवतानाच नीलेश १३ वर्षांची रिया व ७ वर्षांची रिचा या दोन लहान मुलींना घेऊन फरार झाला. सुजाता यांना उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. नीलेश स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत, तर सुजाता एमबीबीएस होत्या.
नीलेश व सुजाता यांचा विवाह १३ वर्षांपूर्वी झाला. नंतर लगेचच सहा महिन्यांत सुजाता यांचा सासरी छळ होऊ लागला होता. प्रथम रुग्णालयाचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून १५ लाख रुपये आणावेत म्हणून व नंतर चारित्र्याचा संशय घेऊन सुजाताला सासरी मारहाण, उपाशी ठेवण्याचे प्रकार घडू लागले. त्याला कंटाळूनच तिने आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक यादवराव पाटील, निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांनी भेट दिली. अधिक तपास उपनिरीक्षक खंडेराव रंजवे करत आहेत.
अंत्यसंस्कार खोळंबले
छळ वाढू लागल्याने दोन दिवसांपूर्वी डॉ. सुजाता यांनी धुळय़ाला आई-वडिलांना दूरध्वनी करून बोलावून घेतले होते. ते रविवारी दुपारी येथे आले. या दोघांनी शेळके यांना समजावण्याचा प्रयत्न केला. रात्री साडेआठच्या सुमारास देवदर्शन करून येते असे सांगून डॉ. सुजाता वरच्या मजल्यावर गेल्या. तेथूनच त्यांनी खाली उडी मारली. डॉ. नीलेश दोन मुलींना घेऊन फरार झाल्याने सुजाता यांच्या पार्थिवाला अग्नी कोण देणार असा प्रश्न होता. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर अटक करावी अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेत वडील प्रा. अरुण पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. पोलीस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यावर अखेर सायंकाळी सुजाता यांच्यावर नगरमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले.

Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
chhota rajan marathi news, 213 burglary marathi news
कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
Pune, NCP Office bearers, Son, Attacked, Gang, koyata, Dandekar Pool, Six Arrested, crime news, police, politics
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला; दांडेकर पूल परिसरातील घटना, सहाजणांना अटक