दुष्काळाच्या पाहणीसाठी आलेल्या कें द्रीय पथकाला शनिवारी परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्य़ात शेतक ऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. परभणीमध्ये एका शेतक ऱ्याने रुमालाने गळफास घेण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांसमोर केल्याने प्रशासन हादरले, तर उस्मानाबाद जिल्ह्य़ातील दौरा पथकाला दंगल नियंत्रण पथकासमवेत करावा लागला, एवढा राग शेतक ऱ्यांमध्ये दिसून आला. दरम्यान या पथकातील अधिकाऱ्यांची व महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची रविवारी दुपारी बैठक होणार आहे.

परभणी जिल्ह्य़ातील सोनपेठ तालुक्यात पीक पाहणीसाठी शनिवारी दुपारी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने हमरस्त्यावरील वडगाव येथे रस्त्यालगतच्या शेतांची पाहणी केली. वडगाव येथील शेतकरी हरिभाऊ जाधव यांना शेतीची परिस्थिती दाखवताना आपल्या भावना अनावर झाल्या व त्यांनी केंद्रीय पथकासमोर आपल्या गळ्यातील रुमालाने फास घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना तेथे उपस्थित लोकांनी थांबवले. उस्मानाबाद येथेही केंद्रीय पथकाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आळणी येथील शेतकऱ्यांनी वारंवार होणाऱ्या दुष्काळ दौऱ्यावर आक्षेप घेतला. नुसतेच येता आणि पाहून जाता, मदत के व्हा मिळणार असा सवाल केला. शेतकरी एवढे चिडलेले होते की, जिल्हाधिकाऱ्यांना दंगलनियंत्रण पथकाला बोलवावे लागले. पहिल्याच गावात रोषाला सामोरे जावे लागल्याने उस्मानाबाद जिल्ह्य़ातील संपूर्ण दौरा जिल्हा पोलीस संरक्षणात झाला.