जिल्हय़ात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी नाळवंडी रस्त्यावर असलेल्या बडी इदगाह येथे मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केली. ईदनिमित्त मुस्लीम समाज बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.
शहरातील नाळवंडी रस्त्यावर असलेल्या बडी इदगाह येथे मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केली. यानंतर एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, न. प. गटनेते भारतभूषण क्षीरसागर, सभापती संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित राहून मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
उस्मानाबादेत रमजान ईद उत्साहात साजरी
वार्ताहर, उस्मानाबाद
रमजान ईदचा सण मंगळवारी जिल्हाभर मुस्लीम बांधवांनी मोठय़ा उत्साहात साजरा केला. शहरातील ईदगाह मदानावर सकाळी १० वाजता ईदचे सामूहिक नमाजपठण झाले. त्यानंतर एकमेकांना आिलगन देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादीचे माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, शिवसेनेचे आमदार ओमप्रकाश राजेिनबाळकर, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय चारठाणकर, जि. प. उपाध्यक्ष संजय पाटील-दुधगावकर, माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, नायब तहसीलदार राजेश जाधव यांच्यासह विविध पक्ष, संस्था व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील विविध मशिदींमधून सकाळी ईदची नमाज अदा करण्यात आली. ईदचा सण असल्यामुळे शहरातील बहुतांश बाजारपेठ दिवसभर बंदच होती. ईदनिमित्त शहरातील प्रमुख बाजारपेठेसह राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असलेली अनेक दुकाने, मोटार गॅरेज मंगळवारी बंद राहिल्याने शहरातील रस्त्यावर रहदारी तुरळक प्रमाणात जाणवत होती.
सामूहिक नमाजात पावसासाठी प्रार्थना
वार्ताहर, लातूर
ईद उल फित्रच्या सामूहिक नमाजात सर्वाच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या पावसासाठी मंगळवारी येथे प्रार्थना करण्यात आली. मौलाना मुस्तफा मजाहिरी यांनी नमाजापूर्वी ही प्रार्थना केली.
सकाळी साडेनऊ वाजता मौलाना इस्माईल काश्मी यांनी प्रवचनात ईद उल फित्र, अर्थात रमजानच्या सणाचे महत्त्व सांगितले. सर्वाना सोबत घेऊन हा सण साजरा केला पाहिजे. आनंदाचे क्षण सर्वाच्या सोबत वाटा व सामूहिक आनंद घ्या, असे आवाहन त्यांनी केले. दयानंद महाविद्यालयासमोरील ईदगाह मदानावर मुस्लिम बांधव सामूहिक नमाज अदा करण्यास उपस्थित होते. ईदगाह मदानावर भव्य मंडपही टाकण्यात आला होता. वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू ठेवली होती.
राज्यमंत्री अमित देशमुख, खासदार डॉ. सुनील गायकवाड, उपमहापौर सुरेश पवार, अॅड. समद पटेल, मोईज शेख, जिल्हाधिकारी डॉ. बिपीन शर्मा, पोलीस अधीक्षक बी. जी. गायकर, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, तहसीलदार महेश शेवाळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे, जि.प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, नरेंद्र अग्रवाल, मकरंद सावे, बी. व्ही. मोतीपवळे आदींची उपस्थिती होती.
परभणीत रमजान ईद मोठय़ा उत्साहात साजरी
वार्ताहर, परभणी
रमजान ईद मुस्लिम बांधवांनी मोठय़ा आनंदात व उत्साहात साजरी केली. दिवसभर एकमेकांना आिलगन देत शुभेच्छा देण्यात आल्या. ईदगाह मदानावर मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. या वेळी मोठय़ा संख्येने मुस्लिम बांधव हजर होते.
ईदनिमित्त सर्वत्र मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. ईदगाह मदानावर सकाळपासूनच मोठी रीघ लागली होती. सकाळी साडेनऊ वाजता नमाज अदा करताना संपूर्ण ईदगाह मदान गर्दीने अक्षरश: फुलून गेले हाते. हाफीज नजीर अहमद खान या मौलवींनी या वेळी पठण केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी एस. पी. सिंह, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नियती ठाकर आदींनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. महापौर प्रताप देशमुख, आयुक्त अभय महाजन, उपायुक्त दीपक पुजारी, नगरसेवक विजय धरणे, बाळासाहेब बुलबुले, सचिन देशमुख आदी उपस्थित हाते. काँग्रेसच्या वतीने संजीवनी मित्रमंडळाचे अध्यक्ष आनंद भरोसे, माजी खासदार तुकाराम रेंगे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे, नगरसेवक गणेश देशमुख आदी उपस्थित होते. संपूर्ण शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. सकाळची नमाज अदा केल्यानंतर दिवसभर मुस्लिम बांधवांनी परस्परांना आिलगन दिले.